आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टटाइम पेन विकत- विकत बनवली स्वत:ची पार्कर पेन कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८८८ जॉर्ज एस. पार्कर विन्सकॉन्सिनमधील जेंसवेलीत टेलिग्राफी शिकवत हाेते. तसेच पार्टटाइम व्यवसाय म्हणून विद्यार्थ्यांना जॉन हॉलेंड कंपनीचे पेन विकत हाेते. परंतु कंपनीच्या पेनात एक समस्या हाेती. त्याची शाई लीक हाेत हाेती. त्यामुळे त्यांना खराब पेन दुरुस्त करावे लागत. यासाठी कटर, लेथसारखे काही उपकरणे त्यांच्याकडे हाेती. विकलेले पेन खराब झाल्यावर विद्यार्थी ते परत घेऊन येत हाेते. मग पार्कर त्यांना दुरुस्त करून परत देत हाेते. वारंवार येणार्‍या या अडचणीमुळे ते नाराज झाले. त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचे हाेते. त्यामुळे त्यांनी एक फीडर तयार केले. त्याला एका हाेल्डरमध्ये फिट करून दिले. हा प्रयाेग चांगलाच यशस्वी झाला.

या पद्धतीने त्यांनी फाउंटन पेनला नवीन आकार देत पहिला पार्कर पेन बनवला. पार्कर यांनी त्याचे पेटेंटही घेतले. व्यावसायिक पद्धतीने त्याची विक्री करू लागले. ते या पेनेची विक्री वाढवू इच्छित हाेते. परंतु त्यांच्याकडे विक्रीसाठी सेल्समनची टीम नव्हती. तसेच माेठ्या प्रमाणावर निर्मिती करू शकतील, इतका पैसाही नव्हता. फक्त एकच गाेष्ट त्यांच्या बाजूने हाेती. ती म्हणजे जेंसवेली हे स्थानिक व्यापारासाठी माेठे केंद्र हाेते. त्यामुळे अनेक व्यापारी त्या ठिकाणी येत हाेते. शहरात अनेक हाॅटेल हाेते आणि अनेक कंपन्यांचे सेल्समन याठिकाणी येत हाेते. मग पार्कर यांनी या वेगवेगळ्या कंपन्यांच्या सेल्समनमार्फत आपल्या पेनाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या पेनाची विक्री वाढू लागली. १८९२ मध्ये स्थानिक विमा व्यवसायात कार्यरत असलेल्या डब्ल्यू एफ पाल्मर यांनी पार्कर यांच्या व्यवसायात रस दाखवला आणि त्यात सहभागी हाेण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला पार्कर यांनी नकार दिला. पाल्मर यांनी त्यांचे मन वळवले. पार्कर यांना गुंतवणुकीची गरज हाेती. परंतु जास्त गुंतवणुकीची गरज नव्हती. त्यामुळे पार्कर यांनी पेटेंटचे अर्धे अधिकार पाल्मर यांना एक हजार डॉलरमध्ये विकले. ते पार्कर विक्री व जाहिरातीचे काम पाहत हाेते. अर्थ आणि नियाेजनाचे काम पाल्मर यांच्याकडे हाेते. १८९८ मध्ये एका चार मजली इमारतीत कार्यालय शिफ्ट केले गेले. त्याठिकाणी फाउंटन पेन आणि शाई बनवली जात हाेती.

१८९४ मध्ये पार्कर यांनी लक्की कर्व नावाचा नवीन पेन बनवला. हा पेन बाजारात लाॅन्च केला. त्यानंतर पार्कर कंपनी प्रसिद्ध झाली. १९२० पर्यंत ते कंपनीचे महत्त्वपूर्ण प्राॅडक्ट हाेती. पार्कर पेनच्या यशानंतर जेंसवलीमधील इतर कंपन्याही पेनाची निर्मिती करू लागल्या. १९०३ मध्ये कंपनीने पहिल्यांदा स्कंॅडेनेव्हियात पहिला डिस्ट्रीब्यूटरची नियुक्ती केली. त्यानंतर डिस्ट्रब्यूटरची संख्या वाढत शंभरापर्यंत गेली. पहिल्या महायुद्धादरम्यान कंपनीने युद्धाच्या क्षेत्रात सैनिकांना उपयाेगी पडू शकेल, असे पेन बनवले. टाेरंटाे, कॅनडा आणि इंग्लडमध्ये कंपनीच्या प्राॅडक्टची निर्मिती सुरू झाली. कंपनीने सर्वात प्रसिद्ध जॉटर पेन बनवला. त्या माध्यमातून बाॅलपेनच्या बाजारपेठेत १९५४ मध्ये कंपनीने प्रवेश केला. जगभरात काेट्यवधी जॉटर पेनाची विक्री झाली हाेती. कंपनीने १९४१ मध्ये ‘५१' या पेनाची निर्मिती केली. त्यामुळे पेनाच्या निर्मिती करणार्‍या कंपन्यांमध्ये टाॅपची कंपनी म्हणून पाॅर्करची आेळख झाली. अनेक कंपन्यांनी त्याची काॅपी करून असे पेन बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. आजही फाउंटन पेन याप्रकारात कंपनीची माेनाेपाॅली आहे. कंपनीच्या प्रीमियम पेनचा उपयाेग एक्झिक्युटीव्ह गिफ्ट म्हणून केला जाताे. कंपनीचे डनफोल्ड इंटरनॅशनल, सोनेट आणि पार्कर १०० हे माॅडेल सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

जॉर्ज एस.पार्कर, संस्थापक, पार्कर पेन