आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 हजार ते 1.25 लाखांत सुरु करा स्वत:चा बिझनेस, केंद्र सरकार देते कर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील छोटया उद्योजकांसाठी एखादी बँक असावी, या उद्देशाने केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरु केली आहे. देशातील छोट्या उद्योजकांना अर्थसाहाय्य करण्‍यासाठी केंद्र सरकारने 'मुद्रा' अर्थात 'मायक्रो यूनिट डेव्हलपमेंट अॅण्‍ड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड'ची स्थापना केली आहे. या योजनेतंर्गत देशातील जवळपास सर्व प्रमुख बॅंक व फायनान्स कंपन्या सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणार आहे.

मुद्रा बँकेला तूर्त पंतप्रधानांच्या जन धन योजनेला जोडण्यात आले आहे. या योजनेचे बँकेत रूपांतर करण्यासाठी येत्या वर्षभरात संसदेत विधेयक सादर केले जाणार आहे. वार्षिक सात टक्के दराने ही वित्तसंस्था देशातील छोटया उद्योजकांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा उपलब्ध करून देईल. 20 हजार कोटी रुपयांची ही योजना देशातील 5.77 कोटी उद्योजकांना आर्थिक सहकार्य करणार आहे.

शिशू, किशोर, तरुण या नावाच्या योजनाही मुद्राअंतर्गत सादर करण्यात आल्या आहेत. 50 हजार, पाच लाख व 10 लाख रुपये अशा टप्प्यांपर्यंत कर्जवितरण करण्यात येईल. योजनेसाठी सरकारने तीन हजार कोटी रुपयांची पत हमी निधीही उभारण्यात आला आहे. मुद्रा बॅंकेच्या माध्यमातून लोकांना विविध छोट्या उद्योगांविषयी मार्गदर्शन केले जात आहे. कोणता उद्योग सुरु करण्यासाठी किती भांडवल अपेक्षीत आहे, याविषयी तरुणांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पंतप्रधान मुद्रा योजनेची वैशिष्टये:
> देशातील 5.77 कोटी उद्योजकांना अर्थसाहाय्य
> वार्षिक सात टक्के दराने 10 लाख रुपयांपर्यंत मिळेल कर्ज
> 20 हजार कोटी रुपयांचे भक्कम सरकारी भांडवल
> रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार
> सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक

पुढील स्लाइडवर वाचा, तुम्ही 80 हजारांत सुरु करू शकतात हा बिझनेस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...