तुम्ही नवा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 2 ते 3 लाख रुपयांत तुम्ही पंतप्रधान मुद्रा स्कीमनुसार अनेक बिझनेस सुरु करु शकतात. आजच्या घडीला तुम्ही बिझनेस सुरु केला तर वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपये नफा कमावू शकतात.
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुद्रा स्कीमनुसार बॅंकेमार्फत तुम्हाला बिझनेस सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. विशेष म्हणजे हे कर्ज इतर सरकारी बॅंकांच्या स्कीमच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला पाच बिझनेसविषयी माहिती देत आहोत. बिझनेस सुरु करण्यासाठी मु्द्रा स्कीमनुसार बॅंक सहज कर्ज उपलब्ध करून देते.
सुरु करा लाइट इंजीनियरिंग यूनिटतुमच्याकडे 1.88 लाख रुपयांचे भांडवल असेल तर तुम्हाला लाइट इंजीनियरिंग (नट, बोल्ट, वायसर अथवा खिळे आदी) मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरु करता येईल. मुद्रा स्कीमनुसार बॅंक तुम्हाला 2.21 लाख रुपये टर्म लोन व 2.30 लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या रुपात लोन सहज उपलब्ध करून देईल. एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही जवळपास 2500 किलोग्रॅम नट-बोल्ट बनवू शकतात. वर्षाकाठी तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवू शकतात.
पुढील स्लाइडवर वाचा– असा सुरु करा वूडन फर्नीचरचे यूनिट