आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Consumers The Benefits Finance Minister Arun Jaitley

व्याजदर कपात : ग्राहकांपर्यंत लाभ द्या, अर्थमंत्री अरुण जेटली यांचा बँकांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेल्या कपातीचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वागत करतानाच देशातील गुंतवणुकीला तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी कमी झालेल्या व्याजाचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असा सल्ला बँक उद्योगाला दिला आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे निधी खर्च कमी होऊन त्याचा आर्थिक सुधारणा होण्यासाठी मदत होऊ शकेल, असे सांगून जेटली म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय धोरणात्मक साहाय्य करणारा असून त्यामुळे सुधारणा प्रक्रियेला वेग मिळू शकेल.
या व्याजदर कपातीमुळे गुंतवणूक आणि आत्मविश्वास उंचावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. महागाईवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे; परंतु रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला यावरून महागाईचा ताण बऱ्या प्रमाणात कमी झाला असून आता महागाई स्वीकारार्ह पातळीवर असल्याचे दिसून येते. यामुळे वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य गाठण्यावर भर देण्यात येईल.
सणांमध्ये बाजारात दिसेल परिणाम
बी. बी. भट्टाचार्य, अर्थतज्ज्ञ
अर्थव्यवस्थेवर परिणाम : रिझर्व्ह बँकेने खूप उदार धोरण अवलंबले आहे. गृहकर्ज स्वस्त झाल्याने घरांच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सणांची सुरुवात होत आहे. रिअल इस्टेट, ऑटोमोबाइल क्षेत्र, गृहोपयोगी वस्तूंमध्ये परिणाम दिसेल. उद्योगांनी जे मागितले, रिझर्व्ह बँकेने त्यापेक्षा जास्त दिले.

व्याजदरावर परिणाम : जमा आणि कर्जावरील व्याजदर कमी होतील. गृह कर्ज ०.४ ते ०.५ % स्वस्त होऊ शकते. उद्योगांचे कर्ज ०.२५ ते ०.४ % स्वस्त होऊ शकते.

महागाईवर परिणाम : सध्या महागाई जागतिक कारणांमुळे कमी झाली आहे, देशातील कारणांमुळे नाही. कमोडिटी आणि टीव्ही-मोबाइल सारख्या वस्तूंच्या दरात घट होईल. मात्र देशामध्ये मान्सूनचा पाऊस खराब झाल्याने खाण्या-पिण्याच्या वस्तू महाग होतील.

जास्त कपात का? : बाजाराची दिशा बदलण्यासाठी त्याला शॉक देणे आवश्यक आहे. जर ०.२५ % कपात झाली असती तर बाजारावर परिणाम झाला नसता. जे धोरण शॉक देते, तेच धोरण अर्थशास्त्रास यशस्वी मानले जाते.

पुढे काय : रिझर्व्ह बँक ‘वेट अँड वॉच'च्या धोरणाचा अवलंब करेल. पुढचे कोणतेही पाऊल उचलण्यासाठी बँका व्याजदरात किती कपात करतात, यावर रिझर्व्ह बँक बारकाईने लक्ष ठेवेल.