आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godreje Says Business Education Is Must From The Childhood

शाळेपासूनच मिळावेत उद्योजकतेचे धडे : गोदरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-शाळा,महाविद्यालयातच उद्याेजकतेचे धडे गिरवले गेले तर भविष्यात चांगले उद्याेजक घडू शकतात. मात्र, त्यातील अडथळे दूर करून उद्याेजकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकारला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्याेगपती अाणि गाेदरेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक नादिर गाेदरेज यांनी येथे व्यक्त केले.

सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टने जागतिक व्यापार केंद्रात भरवलेल्या ‘उद्याेगबाेध’ या दाेन दिवसांच्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी अाेरॅकल इंडियाचे वरिष्ठ संचालक धनंजय बेंद्रे, केमेक्सिलचे अध्यक्ष अाणि व्ही. व्ही. एफ. लिमिटेडचे संचालक डॉ. बी. आर. गायकवाड हे उपस्थित हाेते. नादिर गाेदरेज यांनी उद्याेग अाणि उद्याेजकांच्या व्यथा अाणि अडचणी, सरकारची भूमिका अादी विविध गाेष्टी त्यांनी ‘आंत्रप्रेन्योरशिप’ या कवितेतून मांडल्यावर सगळ्यांनाच अाश्चर्याचा धक्का बसला. गाेदरेज यांच्या हस्ते ‘उद्याेगबाेध २०१६’ या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच सॅटर्डे क्लबच्या काही मान्यवरांचा सत्कार करण्यात अाला. सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधवराव भिडे यांनी क्लबच्या स्थापनेपासून ते अाजवरच्या प्रगतीचा अाढावा घेतला. या परिषदेला राज्यातून ३०० प्रतिनिधी उपस्थित अाहेत.

अडचणीचीकररचना नकाे
उद्याेजकांच्याअडचणीत भर पडेल अशी कररचना नकाे, अन्यथा ते अन्य राज्यात जातील. त्यामुळे राज्य सरकारने उद्याेजकांना अनुकूल ठरेल असे धाेरण राबवण्याची गरज अाहे, असे मत केमेक्सिलचे अध्यक्ष व्ही.व्ही.एफ. लि. संचालक डाॅ. बी.अार. गायकवाड यांनी व्यक्त केले.

साेशलमीडिया विस्ताराची गुरुकिल्ली
अापणिकतीही प्रतिभावंत असलो तरी अाजच्या काळात साेशल राहणे म्हणजे साेशल मीडियाचा अाधार घेणे गरजेचे अाहे. कारण तीच अाता व्यवसाय विस्ताराची गुरुकिल्ली ठरणार अाहे, असे मत अाेरॅकल इंडियाचे वरिष्ठ संचालक धनंजय बेंद्रे यांनी व्यक्त केले.