आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने पुन्हा @ ३१ हजारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सणासुदीच्या दिवसात मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याने सोने पुन्हा एकदा ३१ हजारांच्या पातळीवर पोहोचले आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी झालेल्या व्यवहारात सोने ४७० रुपयांनी वधारून ३१,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले.   स्थानिक सुवर्णकारांच्या वतीने सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे औद्योगिक मागणी नसल्यामुळे चांदीच्या किमतीमध्ये मंदी दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात चांदी ३०० रुपयांच्या घसरणीसह ४१,७००  रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने विक्री झाली. 
बातम्या आणखी आहेत...