नवी दिल्ली - सोन्याच्या किमतीमध्ये सलग तीन दिवस पडझड झाल्यानंतर शुक्रवारी थोडी वाढ दिसून आली. ज्वेलरीची मागणी वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ४५ रुपयांनी वाढून २६,४६० रुपये प्रति तोळ्यावर गेेली. सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीची किंमत ५० रुपयांनी कमी होऊन ३५,२०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
जागतिक बाजारात सोने ३ डॉलरच्या पडझडीसह ११०६ डॉलर प्रति तोळ्यावर आले आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने जवळपास दशकानंतर व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या भावावर दबाव पडत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फेडरल रिझर्व्हची दोनदिवसीय बैठक १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळेच गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव कमी होत असले, तरी मागणीमुळे देशात भाव वाढले आहेत.