आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन सणासुदीच्या तोंडावर तीन दिवसांत सोने ९०० रुपयांनी स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने स्वस्त झाले आहे. दिल्ली सराफा बाजारात शनिवारी सोने दहा ग्रॅम मागे ८० रुपयांनी घटून ३०,२४० रुपये झाले. तीन दिवसांत सोने ९३० रुपयांनी स्वस्त झाले. मागणी घटल्याने सोन्याची किंमत घसरत असल्याचे किरकोळ सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सोन्याचा हा तीन महिन्यांतील नीचांक आहे. सराफा बाजारात चांदी मात्र चकाकली. मागणी वाढल्याने चांदी किलोमागे ३७० रुपयांनी वाढून ४२,३०० रुपयांवर पोहोचली.
बातम्या आणखी आहेत...