आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेलायमान स्थिती : ब्रेक्झिट इफेक्टमुळे साेने कडाडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा काैल ब्रिटनमधील नागरिकांनी देताच शुक्रवारी भारतासह जगभरातील शेअर बाजार काेसळले. या घडामाेडींचा साेन्याच्या दरावरही परिणाम हाेऊन या माैल्यवान धातूच्या दरात तब्बल १७०० रुपयांनी वाढ हाेऊन ताे ३१,६१४ अशा दाेन वर्षांपूर्वीच्या उच्चांकी पातळीवर गेला. साेन्याबराेबर एक िकलाे चांदीचा भावदेखील १४०० रुपयांनी वाढून ताे ४२,५०० रुपयांवर गेला. युराेपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर अांतरराष्ट्रीय पातळीवरील दाेलायमान स्थिती कायम राहणार अाहे. परिणामी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पुन्हा साेन्याची मागणी वाढणार अाहे. परिणामी येणाऱ्या काळात सराफ बाजारातील तेजी अशीच कायम राहून दिवाळीपर्यंत साेन्याचा भाव ३५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली अाहे.

युराेपीय संघातून ब्रिटनला बाहेर पडण्यासाठी काैल मिळाल्यावर सराफा बाजारात एकाच दिवसात दहा ग्रॅम साेन्याच्या भावात ५०० रुपयांनी, तर चांदीच्या भावात १६०० रुपयांनी वाढ झाली अाहे. पुढील दाेन दिवस सराफ बाजार बंद असल्याने चढ्या पातळीवर असलेला साेन्याचा भाव थाेडाफार कमी हाेईल. पण त्यानंतर मात्र साेन्याच्या किमती कमी हाेण्याची शक्यता नाही. साेन्याच्या भावातील तेजीचा कल असाच कायम राहणार अाहे. युराेपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय पक्का झाला तर साेन्याचा भाव ३३ हजारांवर तर चांदीचा भाव ४८ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता अाहे. तेजीचा हा कल असाच कायम राहून दिवाळीपर्यंत साेन्याचा भाव ३५ हजार रुपयांवर तर चांदीचा भाव ५० हजार रुपयांवर जाईल, असे मत बुलियन तज्ज्ञ अश्विन देरासरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.

युराेपीय संघातून ब्रिटन बाहेर पडेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे या अचानक घडलेल्या घडामाेडीमुळे बाजाराला धक्का बसला अाहे. या घडामाेडीमुळे चलन बाजारात डाॅलर भक्कम हाेऊन पाउंड चलनात माेठी घसरण झाली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर साेने बाजारात एक सुरक्षिततेचे पाऊल म्हणून साेने खरेदी केले अाहे. येणाऱ्या काळात युराेपमध्ये काय हाेते हे बघायला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर येेणाऱ्या काळात डाॅलरचे मूल्य वाढणार अाहे. युराे अाणि पाउंड चलन कमकुवत झाल्यामुळे मध्यवर्ती बँकांकडून साेन्याची मागणी वाढेल. माेठ्या वित्तीय संस्थांकडूनदेखील साेन्याची खरेदी केली जाईल. युराेपमधील िचत्र जाेपर्यंत स्पष्ट हाेत नाही ताेपर्यंत सुरक्षिततेचा पर्याय म्हणून साेन्यामध्ये गुंतवणुकीचा कल राहील, असे मत सोने व्यापारी साैरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.

ब्रेक्झिटचा परिणाम अाणखी चार-पाच महिने कायम राहणार अाहे. त्यातून अन्य देशांनीही युराेपीय संघातून बाहेर पडण्याचा िवचार केला तर डाॅलरचे मूल्य अाणखी वाढेल. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून साेन्याचे महत्त्व येणाऱ्या काळात वाढणार अाहे. त्यामुळे िदवाळीपर्यंत साेन्याचा भाव ३५ हजार रुपयांचे िशखर गाठेल, असा अंदाजही गाडगीळ यांनी व्यक्त केला.

तेजी राहणार
जपान अापल्या नकारात्मक व्याजदर धाेरणामध्ये २५ जूनपर्यंत बदल करणार हाेता; परंतु ब्रेक्झिट प्रकरणानंतर जपानने हे धाेरण यापुढे कायम ठेवण्याचे धाेरण कायम ठेवले अाहे. अमेरिकेची फेडरल िरझर्व्हदेखील या पार्श्वभूमीवर व्याजदर वाढवण्याची शक्यता नाही. या सगळ्या गाेष्टी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धाेकादायक असून पुन्हा मंदीची शक्यता अाहे. त्यामुळे साेन्यातील तेजी व गुंतवणुकीचा कल कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

गुंतवणुकीची याेग्य वेळ
सध्या ३१ हजारांच्या वर गेलेल्या साेन्याच्या भावात पाचशे रुपयांनी घट हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे ग्राहकांनी दाेन िदवस प्रतीक्षा करून साेने खरेदी करावी; पण त्यानंतर साेन्याच्या भावातील तेजी कायम राहणार अाहे. साेन्यामधील सध्याची तेजी गुंतवणूक करण्यासाठी याेग्य वेळ असल्याचे मत सराफा तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पुढे वाचा, भारतावर परिणाम अल्प कालावधीपुरता राहील...
बातम्या आणखी आहेत...