आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Pares Gains After Fed Leaves Door Ajar To June Rate Hike

सुवर्णकारांचा संप मिटल्यानंतर सोने २१५५ रुपयांनी महागले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशभरातील सुवर्णकारांचा दोन दिवसांचा संप संपल्यानंतर सोन्याच्या किमतीतही थोडी वाढ नोंदवण्यात अाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत २१५५ रुपयांनी वाढून २९,७९० रुपये प्रती दहा ग्रॅमवर गेली आहे, तर चांदीची किंमतही ७७५ रुपयांनी वाढून ४०,९७५ रुपये प्रती किलोवर पोहोचली आहे.

जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारात देखील दिसत आहे. नायमॅक्सवर सोने ४.४ डाॅलरने वधारले, तर चांदीच्या किमतीमध्ये देखील ०.२४ डाॅलरची वाढ नोंदवण्यात आली.

देशात सध्या लग्नसराई सुरू असून त्यामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे देखील सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या वतीने एक टक्के अबकारी शुल्क लावण्यात आल्यामुळे सोने व्यापाऱ्यांनी देशभरात संप पुकारला होता. ४१ दिवसांच्या संपानंतर सरकारने आश्वासन दिले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा २५ ते २६ एप्रिल दरम्यान संप पुकारण्यात आला होता. या दोन दिवसांनंतर सुवर्णकारांनी दुकाने उघडली. त्यातच लग्नसराई असल्याने दुकानांमध्ये गर्दी वाढली. सोन्याची मागणी वाढल्याचा परिणाम किमतीवर देखील दिसून आला. वास्तविक दिल्लीतील हाजीर बाजारात चांदीचे नाणे जुन्या दरावरच ट्रेड होत आहेत. चांदीच्या १०० नाण्यांचा भाव ६४,००० तर विक्रीचा भाव ६५,००० रुपये बोलला जात आहे.