नवी दिल्ली - देशातील ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून मागणी नसल्याने तसेच जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेताचा दबाव देशातील सराफा बाजारात गुरुवारी दिसून आला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ४०० रुपयांनी घसरून २६,७५० झाले.
चांदी किलोमागे १३५० रुपयांनी स्वस्त होऊन ३६,६५० झाली. दरम्यान विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ६२.२४ वर स्थिर राहिला. सराफा व्यापार्यांनी सांगितले, अमेरिका फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा परिणाम सराफा बाजारावर दिसून आला.