आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 27300 रुपये प्रतितोळा, किमतीत सहा टक्के वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत असल्यामुळे सणासुदीच्या काळातच सोन्याची मागणी कमी होण्याची शंका व्यक्त होत आहे. खराब मान्सूनमुळे ग्रामीण भागातील वातावरण नकारात्मक असून ग्राहक किमती कमी होण्याची वाट पाहतील, अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नवरात्रीचा उत्सव म्हणजेच सणांना सुरुवात मानली जाते. या आधी येत असलेल्या पितृपक्षामुळे देशातील अनेक खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवलेले असतात. त्यांनी नवरात्रीकाळात मागणी वाढल्याचे चित्र असते. यामुळेच नवरात्र सुरू झाल्यावर सोन्याच्या भावामध्ये तेजी दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात २१ सप्टेंबरला २५,७०० रुपये प्रतितोळा भावाने सोन्याची विक्री झाली. नवरात्रीला सुरुवात होताच यामध्ये वाढ होऊन सोने २७००० रुपये प्रतितोळ्यावर गेले
होते. गुरुवारी सोने २७३०० रुपये प्रतितोळा विक्री झाले. म्हणजेच तीन आठवड्यांत सोन्याच्या किमती ६ टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढल्या आहेत.