आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Prices Fall To Near 6 Year Lows, Down 300 Rs

दीपावलीनंतर सोन्याचे दिवस; सोने 300 रुपयांनी स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दीपावलीनंतर देशातील मागणी कमी झाल्यामुळे शुक्रवारी सोन्याचे भाव ३०० रुपयांनी उतरले आहेत. दिल्ली सराफा बाजारात ९९.९ शुद्ध सोन्याचे भाव २५,९५० रुपये आणि ९९.५ शुद्ध सोन्याचे भाव २५,८०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहेत.

गेल्या तीन महिन्यांतील हे सर्वात कमी भाव आहेत. याआधी ११ ऑगस्टला सोने याच भावाने विक्री झाले, तर चांदीदेखील ५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीची नाणी तसेच उद्योग क्षेत्रातील मागणी घटल्यामुळे चांदीचे भाव ३४,४०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

सोन्याची मागणी अत्यंत कमी असल्याचे मत केडिया कमोडिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय केडिया यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अमेरिकेतील व्याजदरात वाढ आणि सोन्यावरील आयात शुल्क कमी होणार असल्याच्या बातम्यांमुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. पुढील काळातदेखील भाव कमी होण्याची शक्यता आहे. आता विदेशातही सोन्याचे भाव कमी झाले असल्याचे मत अखिल भारतीय सराफा ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. के. जैन यांनी व्यक्त केले.