आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 30,350 रुपये दहा ग्रॅम, दोन वर्षाची उच्चांकी वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारातील अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असून गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सलग वाढ नोंदवण्यात येत आहे. शनिवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने दोन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठत प्रति दहा ग्रॅम ३०,३५० रुपये दराने विक्री झाले. याआधी १० मे २०१४ रोजी सोन्याने ३०,३५० रुपये प्रति दहा ग्रॅमची पातळी गाठली होती.

जागतिक बाजारातील वाढलेली किंमत आणि देशांतर्गत बाजारात लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याचे दर वाढले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दिल्ली सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या किमतीत २२५ रुपयांची वाढ होऊन सोने ३०,३५० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले. सोमवारी (९ मे) अक्षय्य तृतीया असल्याने या दिवशी सोन्याच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे मागणीत वाढ होऊन सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी जाहीर झाली असून यात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नसल्याने तेथील बाजारात मंदी दिसून आली. यामुळे फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्याची शक्यतादेखील कमी झाली असून त्याचा परिणाम सोन्यातील गुंतवणुकीवर झाला आहे. सोन्यामधील गुंतवणूक वाढल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

चांदीच्या किमतीत वाढ
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात अाली असून देशांतर्गत बाजारात चांदी ५१० रुपयांच्या वाढीसह ४१,५५० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. जागतिक बाजारातदेखील चांदीच्या किमतीत ०.७५ टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली आहे. औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...