आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिर किमतीमुळे अक्षय्य तृतीयेला साेने खरेदीला मिळणार झळाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साेन्याच्या किमती एका ठरावीक पातळीतच फिरत असल्याने अक्षय्य तृतीयेला साेने खरेदीला लकाकी येण्याची अपेक्षा सराफा बाजारात व्यक्त करण्यात येत अाहे. यंदा साेन्याच्या विक्रीत २५ टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे. अार्थिक वर्ष संपणार असल्यामुळे दाेन-तीन अाठवड्यांपूर्वी साेने विक्रीला फारसा उठाव नव्हता.

पण गेल्या काही महिन्यांपासून साेन्याच्या किमतीत नरमाई असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला दागिने विक्रीला चालना मिळेल, असे मनुभाई ज्वेलर्सचे संचालक समीर सागर यांनी सांगितले. सध्या साेने २७ हजार रुपयांच्या अासपास स्थिरावल्यामुळे अक्षय्यतृतीयेलाही त्या त्याच पातळीवर राहतील, असे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साैरभ गाडगीळ म्हणाले.

यंदाच्या वर्षी साेन्याची नाणी, साखळ्या, बांगड्या यांसारख्या लहान माैल्यवान वस्तूंची विक्री जास्त हाेईल, असा अंदाज सराफा विक्रेत्यांनी व्यक्त केला अाहे. या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ हाेण्याचा अंदाज अाहे.

पुढील तीन महिने भाव २७ हजार रुपयांच्या खालीच
एक ताेळा साेन्याचा भाव सध्या २५,६०० रुपयांच्या अासपास घुटमळत अाहे. रुपयाच्या तुलनेत डाॅलरला अाणखी बळकटी मिळण्याची शक्यता तसेच अमेरिकेच्या फेडरल िरझर्व्हकडून व्याजदर कमी हाेण्याची शक्यता. यामुळे पुढील तीन महिन्यांत साेन्याचा भाव २५,६०० ते २६,००० रुपयांच्या अासपास राहण्याचा अंदाज एंजेल ब्राेकिंगच्या जिन्नस अाणि चलन विभागाचे सहसंचालक नवीन माथूर यांनी व्यक्त केला.

लग्नसराईसाठी अनुकूल
लग्नसराईचा हंगाम सुरू हाेत असल्यामुळे वधूच्या अलंकारांची बुकिंग १० ते १५ दिवस अगाेदर हाेते; पण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या खरेदीला अाणखी वेग येताे. वधू अलंकारांच्या विक्रीत यंदा २० ते २५ टक्क्यांनी वाढ हाेण्याचा अंदाज सराफा विक्रेत्यांनी व्यक्त केला.

विक्रीत १० ते १५ टक्के वाढ शक्य
केंद्र सरकार राबवत असलेली सकारात्मक धाेरणे अाणि सोन्याच्या स्थिरावलेल्या किमतींमुळे ग्राहकांची खरेदीची मानसिकता बदलत अाहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अक्षय्य तृतीयेला साेन्याच्या विक्रीत १० ते १५ टक्के वाढ हाेण्याचा अंदाज अाहे. अाॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनचे अध्यक्ष मनीष जैन यांनीदेखील स्थिर किमतींमुळे सराफा बाजारात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले.