आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 24 हजारांवर येणार, अडीच वर्षांत सोने 7,300 रुपयांनी स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/जयपूर/मुंबई/नवी दिल्ली- सोन्याचे दर जगाला चकित करत आहेत. दररोज घसरत्या दरांमुळे दागिने खरेदीदारांसह गुंतवणूकदार हैराण आहेत. सोने आणखी स्वस्त होण्याच्या आशेने ग्राहक खरेदी टाळत आहेत. दुसरीकडे, गुंतवणूकदारांचा भरवसाच उडाला आहे.

दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव ३०० रुपयांनी कमी झाला. २०१२ मध्ये स्थानिक सराफ्यात प्रतितोळा ३२,४०० रुपये (२२ कॅरेट) पोहोचलेल्या सोन्याने सोमवारी २५,५५० रुपये हा दोन वर्षांचा नीचांक गाठला. म्हणजेच जवळपास २१% स्वस्त. औरंगाबादेत सोन्याचे भाव २५,८०० रुपये होते.
ही घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत. "दिव्य मराठी'ने सराफा तज्ज्ञ, ज्वेलर्सशी केलेल्या चर्चेत २ महिन्यांत सोने २४ हजारांपर्यंत येण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुंबई इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनुसार सोने २०,५०० रुपयांपर्यंतही येऊ शकते.

वैश्विक बाजारांत सोने ५ वर्षांच्या नीचांकावर पोहोचले. दर ४०% घटले आहेत. सोन्याऐवजी शेअर्समध्ये होणारी गुंतवणूक ही घसरणीची मुख्य कारणे आहेत.

यामुळे मोहभंग : सोन्याने 9% तोटा केला, शेअर्सनी 43% नफा मिळवून दिला

शेअर्सनी पाडला सोन्याचा भाव
भारत सोन्याऐवजी शेअर बाजारातून जास्त कमाईची आशा. भारतात पैसे सुरक्षित करण्यासाठी सोने खरेदी होते. सध्या शेअर बाजार तेजीत आहे. २ वर्षांत शेअरने ४३% रिटर्न दिला आहे.

अमेरिका सरकार हळूहळू आर्थिक पॅकेज घटवत आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. यामुळे सोन्याऐवजी शेअर बाजार व डॉलरमध्ये गुंतवणूक होत आहे. फेडरल रिझर्व्ह
व्याजदरवाढीच्या तयारीत आहे.

दोन वर्षांतील रिटर्न...
- 9.03% सोने
+ 42.68% शेयर
एका वर्षात ८.९६% पडले सोने. ११.३५% चढला शेअर बाजार. (जुलै १४ ते जुलै १५ पर्यंत)
१४ वर्षांत ३७३% तेजी सोन्यात. ६८१% वाढला सेन्सेक्स.

ग्रीस कोंडी फुटल्याने शेअर बाजार, डॉलरच्या मागणीतही तेजी आहे. डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्यातील घसरण आणखी वाढली आहे.

चीन अर्थव्यवस्थेत मंदी असतानाही शेअर बाजार १५०% वाढले. यामुळे सोने व दागिन्यांची मागणी १०% घटली आहे.

भास्कर एक्स्पर्ट‌्स
-नवीन माथुर, असो. डायरेक्टर (कमोडिटी), एंजल ब्रोकिंग
-मोहित कंबोज, अध्यक्ष, अभा बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असो.
-विजय चोरड़िया, अध्यक्ष, सीतापुरा जेम्स अॅण्ड ज्वेलरी इंड. जयपूर
इनपुट- गुरुदत्त तिवारी (भोपाळ), राजेंद्र शर्मा (जयपूर)
बातम्या आणखी आहेत...