आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांत सोने पहिल्यांदाच 31 हजारांच्या वर; जागतिक बाजारातील तेजीचा प‍रिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-कमोडिटी वायदा एक्स्चेंज एमसीएक्सवर गुरुवारी सोन्याच्या किमती ३१,००० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वरती गेल्या आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात आलेल्या तेजीचा परिणाम भारतीय बाजारावर देखील दिसून आला. मे २०१४ नंतर पहिल्यांदाच सोने ३१,००० च्या वरती गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सलग तेजी नोंदवण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांतील आठ दिवस सोन्याचे दर वाढले अाहेत. या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात २४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटी म्हणजेच २०१६ मध्ये, तर सोन्याचे इक्विटी बाजारापेक्षा जास्त परतावा दिला होता. नायमॅक्सावर सोन्याच्या किमतीत २४ डॉलरची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी अनेक तज्ज्ञांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई सराफा बाजारातदेखील सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली असून बुधवारी २९,९२५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर विक्री होणारे सोने गुुरुवारी झालेल्या व्यवहारात सोने ३०,४०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले. सोन्याच्या दराबरोबरच मुंबई सराफा बाजारात चांदीच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी ४१,६७० रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने विक्री झालेली चांदी गुुरुवारी ४२३४० रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने विक्री झाली.

किमती वाढण्याची कारणे
> फेडरलचा निर्णय : जागतिकबाजारात असलेली अनिश्चितता पाहता अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा सोन्याला मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पुढील काळातही व्याजदरात वाढ करण्याचे कोणतेच संकेत फेडरलच्या बैठकीत देण्यात आलेले नाही. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.

>डॉलर दुबळा : फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर जगभरातील प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आहे. डॉलरच्या निर्देशांकात गुरुवारी ०.२ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली आहे.

> ब्रेक्सिटची भीती : युरोपियन युनियम म्हणून इंग्लंड बाहेर पडण्याची भीती वाढत असल्याने जास्तीत जास्त गुंतवणूकदार इक्विटीमधून पैसा काढून सोन्यात गुंतवण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.