आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेक्झिटची भीती : २८ महिन्यांनंतर सोने पोहोचले ३१००० रुपये प्रती दहा ग्रॅमवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक बाजारात वाढलेल्या दरामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. या वाढीसह सोने ३१ हजारांच्या वर गेले असून बुधवारी सोने ३१,०५० रुपये प्रती दहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातदेखील वाढ नोंदवण्यात आली असून ११०० रुपयांच्या वाढीसह चांदी दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर ४७,४०० रुपये प्रतिकिलोग्रॅमने विक्री झाली. मार्च २०१४ नंतर पहिल्यांदाच सोने प्रती दहा ग्रॅम ३१,००० रुपयांच्या वर पोहोचले आहे. त्या वेळी सोन्याच्या दरात ३२० रुपयांची वाढ होऊन सोने ३१,०२० रुपये प्रती दहा ग्रॅमवर पोहोचले होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

या महिन्यातील पहिल्याच आठवड्यादरम्यान आतापर्यंत चांदी ४,४५० रुपये, तर सोने ७०० रुपयांनी महागले आहेत. इंग्लंडच्या नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कल दिल्यामुळे जागतिक बाजारातील अस्थिरता कायम आहे. युरोपियन युनियनमधून अजून काही देश बाहेर पडण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत अाहे. या देशांमध्ये ‘ट्रेड वॉर’ सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे देश आपल्या चलनाची किंमत तसेच व्याजदर कमी करू शकतात. त्यामुळेच आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. सोन्याची मागणी वाढली असून किमतीत वाढ नोंदवण्यात आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सोन्याची मागणी वाढल्यामुळे बुधवारी जागतिक बाजारात सोन्याचे दर १.१ टक्क्याने वाढून १३७१.३९ डॉलर प्रती औंसवर पोहोचले आहेत. मार्च २०१४ नंतर हे सर्वाधिक दर आहेत. चांदीमध्येदेखील २.४ टक्क्यांच्या वाढीसह चांदी २०.४१ डॉलर प्रती औंसवर पोहोचली आहे. याचा
परिणाम भारतीय बाजारावरदेखील दिसून आला.

पाउंड ३१ वर्षांच्या नीचांकावर
ब्रिटनचे चलन असलेले पाउंड ३१ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. बुधवारी एका पाउंडची किंमत १.३० डॉलर होती. पुढील काळात यात आणखी घसरणीची शक्यता आहे. चीनचे चलन असलेले युआनदेखील साडेपाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
गुंतवणूकदार काढताहेत पैसे
ब्रेक्झिटची भीती गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे मंगळवारी अमेरिकी बाँडचे यील्ड ३० वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. याला जगभरातील प्रमुख निर्देशांक मानले जाते. सध्या हा बाँड नकारात्मकतेकडे जात असल्याचे मत ब्रोकर व्यक्त करत आहेत.
जगभरातील शेअर बाजारात घसरण
बुधवारी आशिया आणि युरोपमधील बाजार २.२ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह बंद झाले. अमेरिकी बाजारातही अर्धा टक्क्यापेक्षा जास्त घसरण दिसली. भारतीय बाजारात देखील घसरण नोंदवण्यात आली. गुरुवारी देखील भारतीय शेअर बाजारात घसरण दिसण्याची शक्यता आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...