आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या कम्युनिकेशन्स बँकेने रस्त्यावर लावले सुवर्णजडित वृक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झेंगझोऊ- चीनमधील झेंगझाेऊमध्ये असलेल्या कम्युनिकेशन्स बँकेचे हे छायाचित्र, गेल्या काही दिवसांपासून ही बँक तसेच बँकेच्या मुख्यालयासमोरील रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे.

बँकेने आपल्या मुख्यालयासमोर सोन्याचा मुलामा असलेली झाडे लावली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील प्रत्येक व्यक्ती याकडे आश्चर्याने पाहत आहे. बँक ऑफ कम्युनिकेशन्स आमच्या पैशाचा असा वापर करत असल्याचा काहींनी आरोप केला असून काही व्यक्तींनी हे हास्यास्पद असल्याचे सांगितले आहे. या रस्त्यावर राहण्यासाठी आम्ही गरीब बनायला तयार असल्याचेही लोक म्हणाले. लोकांमध्ये पर्यावरणाची जागृती करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचे बँक व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

>झेंगझोऊ प्रयोगांसाठीच ओळखले जाते. गेल्या वेळीदेखील पानझड लवकर आल्यामुळे झाडांवर खोटी पाने लावण्यात आली होती.
> यासाठी आधी आर्टिफिशियल झाड बनवण्यात आले, त्यानंतर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, संंबंंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...