नवी दिल्ली - अमेरिकेतील गुंतवणूक बँक गोल्डमॅन साक्सने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती २० डॉलर प्रती बॅरलवर येण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, हे कधीपर्यंत होईल याबाबत त्यांनी कोणताच विशिष्ट वेळ दिलेला नाही. असे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. गोल्डमॅनच्या अंदाजानुसार शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड दिसून आली. लंडन बाजारात देखील भाव कमी झाले आहेत.