आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियात एफडीआयची मर्यादा वाढवण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकार मीडिया क्षेत्रात प्रत्यक्ष विदेश गुंतवणूक (एफडीआय)ची मर्यादा वाढवण्यावर विचार करत असून या बाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. देशात विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या पर्यायांवर विचार सुरू आहे. सध्या या क्षेत्रात २६ टक्के एफडीआयला परवानगी आहे. मंत्रिमंडळाच्या मतानुसार ही मर्यादा वाढवून ती ४९ टक्क्यांपर्यंत नेता येऊ शकते, असा विचार मंत्रिमंडळ करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातदेखील या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

सध्याच्या व्यवस्थेनुसार बातम्या आणि चालू घडामोडींवर वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये प्रकाशनासाठी सरकारी मंजुरीनुसार २६ टक्के एफडीआयला मंजुरी आहे.

गेल्या वर्षी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी न्यूज मीडिया क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी देता येऊ शकते का, याविषयी विविध भागीदारांकडून माहिती मागवली होती.
बातम्या आणखी आहेत...