आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या मुदतीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता १२ आणि ३३० रुपये प्रीमियम असलेल्या विमा ३१ मेपर्यंत काढता येणार आहे. या आधीदेखील यासंबंधीची अंतिम तारीख वाढवण्यात आली होती.

या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला १२ रुपयांत अपघात विमा आणि ३३० रुपयांत जीवन विमा काढता येतो. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे आरोग्य प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या वतीने या विमा योजनेची तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.

या आधी योजनेत विमा काढण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती, तिला वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आले होते. त्यांनतर ३१ डिसेंबर करण्यात आली होती. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २८ डिसेंबर रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अंतिम तारीख वाढवून ३१ मे करण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता नाही
अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची अंतिम तारीख ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली असून म्हणजेच मेपर्यंत तुम्ही या योजनेत सहभागी झाल्यास तुम्हाला आरोग्य प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर मात्र, या योजनेत सहभागी होण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...