आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IDS मध्ये 65 हजार कोटींच्या ब्लॅकमनीचा खुलासा, खजान्यात येणार 30 हजार कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारची इन्कम डिस्क्लोजर स्कीम (IDS)अंतर्गत सुमारे 65 हजार कोटींच्या ब्लॅकमनीचा खुलासा झाला आहे. त्यामुळे सरकारच्या खजान्यात सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा निधी गोळा होणार आहे. मात्र सरकारला हा पैशा हप्त्यात मिळणार आहे. या स्कीम अंतर्गत सरकारने ब्लॅकमनीवर 45 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. अरुण जेटली यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जेटली यांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या अडिच वर्षात टॅक्स कम्पलायन्समध्ये सुधारणा आणि करचोरी रोखण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत.

ब्लॅकमनी स्कीम यशस्वी
- 1997 मध्ये आलेल्या व्हीडीएस स्कीमद्वारे सरकारने 10 हजार कोटींचा कर वसूल केला होता.
- त्यानंतर 2015 मध्ये ब्लॅकमनी अँड इम्पोझिशन ऑफ टॅक्सद्वारे 2424 कोटी कररुपाने मिळाले होते.
- या दोन्ही आकड्यांशी तुलना करता मोदी सरकारसाठी हे पाऊल म्हणजे मोठे यश मानले जात आहे.
थायलंडच्या जीडीपीपेक्षा अधिक ब्लॅकमनी
- अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, या स्कीम अंतर्गत 65250 कोटींची अघोषित संपत्ती किंवा मालमत्ता यांची घोषणा करण्यात आली.
- पूर्ण माहिती आल्यानंतर हा आकडा बदलला जाऊ शकतो. 64275 लोकांनी माहिती उघड केली.
- भारतात थायलंडसारख्या देशाच्या जीडीपीएवढा ब्लॅकमनी असल्याचे ते म्हणाले.
ही सूट मिळाली
- मोदी सरकारने ब्लॅकमनी स्कीम यशस्वी करण्यासाठी अनेक प्रकारची सूट देऊ केली.
- इनडिस्क्लोज इनकम घोषित करणारा व्यक्ती हप्त्याने पेनल्टी आणि व्याज परत करेल.
- अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम भरावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...