आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा योजनेमुळे सरकारला १४,७०० कोटी रुपये मिळतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | काळा पैसा घोषित करण्याची योजना नुकतीच संपली असून आयडीएसमुळे सरकारला या वर्षी सुमारे १४,७०० कोटी रुपये मिळतील. देशाच्या जीडीपीच्या तुलनेत हा आकडा ०.१ टक्के असेल. जपानी आर्थिक सल्लागार कंपनी नोमुराच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. वास्तविक योजनेअंतर्गत घोषित करण्यात अालेल्या रकमेवर जो कर भरावा लागणार आहे, त्यातील ५० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात मार्च २०१७ पर्यंत जमा करावी लागणार आहे. ही योजना एक जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सुरू होती. यामध्ये घोषित करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ४५ टक्के कर भरण्याची तरतूद करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ६५,२०० कोटी रुपयांची नगदी आणि इतर संपत्ती घोषित करण्यात आली असल्याचे नोमुराने जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...