आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण, विमान क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- केंद्र शासनाने सोमवारी थेट परदेशी गुंतवणुकीच्या (FDI) नियमांत मोठे बदल केले आहेत. याअंतर्गत सरकारने संरक्षण, विमान, फूड ई-कॉमर्स या क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन म्‍हटले की, "भारत एफडीआयच्‍या दृष्टीकोनातून जगातील सर्वात खुली अर्थव्‍यवस्‍था आहे." सरकार लवकरच निगेटिव्‍ह एफडीआय लिस्‍टची घोषणा करण्‍याची शक्‍यता आहे. सर्वात मोठी गुंतवणूक..

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत एक उच्चस्तरीय बैठक घेण्‍यात आली.
- या बैठकीत एफडीआयमधील बदलाला मंजुरी देण्यात आली आहे.
- नियमांतील बदलामुळे भारत एफडीआयच्या बाबतीत जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था बनला आहे.
- या बदलांमुळे शासनाला पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी मोठे यश मिळेल.
– सरकारी आकड्यांनुसार- 2015-16 या वर्षात देशात थेट परदेशी गुंतवणूक वाढली आहे.
- देशातील परदेशी गुंतवणूक वाढून 55.46 अब्ज डॉलर झाली आहे.
- एखाद्या आर्थिक वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
शेअर बाजारही 200 अंकांनी वधारला
देशात 2013-14 दरम्यान एकूण 36.04 अब्ज डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक होती. शासनाच्‍या आजच्या नियमानुसार अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी भारताची प्रथम क्रमांकाच्‍या एफडीआय डेस्टिनेशनमध्ये निवड केली आहे. शिवाय केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारही 200 अंकांनी वधारला आहे. रोजगाराच्‍या मुबलक संधी निर्माण करण्‍यासाठी याचा फायदा होईल, असे मोदी यावेळी म्‍हणाले. देशातील परदेशी गुंतवणूक वाढावी या उद्देशाने सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील देशातील कंपन्यांना फायदा होणार आहे. तर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या परकीय कंपन्यांनाही भारतात आपला विस्‍तार वाढवता येईल.
बातम्या आणखी आहेत...