आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसला अनेक प्राचीन इमारती, एअरपोर्टही विकावे लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी नवीन पॅकेजनुसार ग्रीसने येणाऱ्या वर्षांत ३४९४ अब्ज रुपयांची संपत्ती विकण्याची परवानगी दिली आहे. युरोपीय कर्जदात्यांशी झालेल्या करारात सांगण्यात आले नाही की, कोणत्या प्रकारची संपत्ती विकण्यात येईल.

जुन्या इमारती
ग्रीसने प्रसिद्ध इमारतींची विक्री सुरू केली आहे. अॅथेन्समधील सांस्कृतिक मंत्रालयाचे कार्यालय विकण्यात आले. राजधानीचे दोन प्राचीन भवन खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. अांतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आईएमएफ)नुसार ग्रीसजवळ ७० हजार अशी संपत्ती आहे, जी विकली जाऊ शकते. तसे ग्रीसच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, अॅक्रोपोलिससारख्या महत्त्वाच्या इमारती विकल्या जाणार नाहीत.

शेकडो बेटे
ग्रीसमध्ये जवळपास ६००० बेटे आहेत. त्यापैकी २२७ निर्जन आहेत. नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिगलिट्जसह अनेक विश्लेषक म्हणतात की, संपत्तीचा बाजार रुळावर आल्यानंतरच सरकारी बेटांची विक्री व्हावी. सध्या अनेक खासगी बेटे २० कोटी रुपयांच्या साधारण किमतीला विकली गेली आहेत.

बंदर
गेल्या २५०० वर्षांमध्ये ग्रीसमधील सर्वात प्रमुख बंदर पिरेअसला विकण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. चीनच्या कोस्को ग्रुपने बंदराच्या दोन कार्गो भागांना पहिलेच ३५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले आहे. सरकार १४ विमानतळांवरील आपली भागीदारी विकण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...