आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Grice Crisis, The European Union Took The Decision Unanimously To Third Aid Package

ग्रीसचे संकट टळले,युरोपियन युनियनने घेतला तिसरे मदत पॅकेज देण्याचा एकमताने निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीसमधील बँका अद्यापही बंद असून एटीएममधूनही मर्यादित पैसे निघत आहेत. - Divya Marathi
ग्रीसमधील बँका अद्यापही बंद असून एटीएममधूनही मर्यादित पैसे निघत आहेत.
नवी दिल्ली- ग्रीसयुरोझोनमधून बाहेर पडण्याचे संकट सध्या तरी टळले आहे. युरोझाेनच्या नेत्यांनी १७ तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर ग्रीसला तिसरे मदत पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियनने अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सर्व देशांनी एकमताने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. युरोपियन स्टॅबिलिटी मॅकेनिझम म्हणजेच ईएमएस योजनेअंतर्गत ग्रीसला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टस्क यांनी सोमवारी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली. ग्रीसने कडक अार्थिक सुधारणा केल्याचे मान्य केले असून इतर देशांना आर्थिक सहकार्य करणार असल्यानेच युरोझोनच्या नेत्यांनी रविवारच्या १७ तासांच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे टस्क यांनी सांगितले.
बँकांना२५०० कोटी युरो मिळणार : ग्रीसलातीन अटी मान्य कराव्या लागणार असल्याचे डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. युरोझाेनचे अर्थमंत्री लवकरच या संदर्भातील नियम तयार करणार आहेत. या तिसऱ्या मदत पॅकेजमध्ये ग्रीसमधील बँकांना २५०० कोटी युरो मिळणार आहेत. त्यासाठी वेगळा निधी बनवला जाणार आहे. ग्रीसला बुधवारपर्यंत सर्व अटी मान्य कराव्या लागतील. त्यानंतर युराेपियन युनियनची बैठक बोलावली जाणार आहे. ग्रीसला एकूण
८००० कोटी युरोची मदत मिळेल.
नवेनियम लागू करणे अवघड : सिप्रास
युरोझाेनसोबतझालेल्या सहमतीनंतर नवे नियम लागू करणे अवघड असून आम्हाला अवघड लढाई जिंकायची असल्याचे ग्रीसचे पंतप्रधान एलेक्सिस सिप्रास यांनी सांगितले. आम्ही देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. ग्रीसला तिसऱ्यांदा ही मदत दिली जात असून त्यासाठी लावण्यात येणाऱ्या नव्या नियमांना बुधवारपर्यंत संसंदेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
भारतीय रुपयाला मदत : अर्थ सचिव
ग्रीसलामिळालेले मदतीचे हे तिसरे पॅकेज भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगले परिणाम करू शकते. हा करार भारतीय रुपयाला लाभदायक ठरणार असल्याचे अर्थ सचिव राजीव महर्षी यांनी सांगितले. तर सरकार करत असलेल्या गुंतवणुकीसाठीदेखील बाजारावर सकारात्मक परिणाम होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सध्या तरी वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...