आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसमधील बँका सोमवारी उघडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन आठवड्यांपासून बंद असलेल्या ग्रीसमधील बँका सोमवारी (२० जुलै) उघडणार आहेत. तसेच बँकांमधून पैसे काढण्यासाठी लावण्यात आलेली बंधनेदेखील हळूहळू दूर करण्यात येणार आहेत. युरोझोनमधील देशांनी ग्रीसला दिलेल्या मदत पॅकेजमुळे बँका उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी युरोझोनच्या नेत्यांनी या मदत प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्याअंतर्गत ग्रीसमधील बँकांना २५०० कोटी युरो मिळणार आहे. ग्रीसला आवश्यकतेनुसार सात अब्ज युरोचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँकेतून एका दिवसात ६० युरो काढण्याचा नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. ग्रीसचे पंतप्रधान एलेक्सिस सिप्रास यांनी सोमवारी बँका उघडण्याचे आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...