मुंबई- माहिती तंत्रज्ञान, बँका अाणि वित्तीय सेवा या क्षेत्रांकडून मागणी वाढल्यामुळे एप्रिल महिन्यात नाेकऱ्यांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी वाढले अाहे. नवीन नाेकऱ्यांसाठी चांगले वातावरण असल्याचे नाेकरी डॉट काॅमच्या एका अहवालात म्हटले अाहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये नाेकऱ्यांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी वाढून नाेकरी डॉट काॅमचा नाेकरी निर्देशांक १७३६ वर गेला अाहे. फेब्रुवारी अाणि मार्चपासून नाेकरी बाजारपेठेला चांगली गती मिळाली असल्याचे कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष अाणि मुख्य विक्री अधिकारी व्ही. सुरेश यांनी सांगितले एप्रिल महिन्यात बँक तसेच विमा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी वार्षिक अाधारावर अनुक्रमे ३० टक्के अाणि २६ टक्क्यांनी वाढली अाहे. हेल्थकेअर अाणि अाैषध उद्याेगातील नाेकऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे ९ अाणि ३ टक्क्यांनी वाढले अाहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर, रिटेल उद्याेगात यंदाच्या एप्रिलमध्ये विक्रमी ३ टक्क्यांनी वाढ झाली अाहे .
नाेकऱ्यांचे प्रमाण सर्व महानगरांमध्ये वाढले असून त्यात बंगळुरू यंदा टाॅपवर अाहे. त्या पाठाेपाठ पुणे, हैदराबाद, मुंबई अािण चेन्नई या शहरांचा क्रमांक लागताे.