आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपात विक्रमी उत्पादन हाेण्याचा अंदाज, कडधान्यासह सर्व पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हवामान खात्याने अपुरा पाऊस हाेण्याचा अंदाज वर्तवलेला असतानाही यंदा खरिपाच्या हंगामामध्ये तेलबिया, कडधान्यांचे विक्रमी उत्पादन हाेण्याचा अंदाज अाहे. या सर्व पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रफळात सर्वाधिक वाढ झाली अाहे.

याअगाेदर २०१०-११ वर्षातल्या खरीप हंगामामध्ये कडधान्ये अाणि डाळींचे उत्पादन अनुक्रमे ३३.०८ दशलक्ष टन अाणि ७.१२ दशलक्ष टन झाले हाेते. त्यानंतर २०१३-१४ च्या खरीप हंगामात डाळींचे विक्रमी २२.६१ दशलक्ष टन उत्पादन झाले हाेते.

जून महिन्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात हाेते अाणि कापणी अाॅक्टाेबर महिन्यात केली जाते. हवामान खात्याने यंदाही अपुरा पाऊस हाेण्याचा अंदाज वर्तवला अाहे. जुलै अाणि ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे ८ अाणि १० टक्के पाऊस कमी पडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात अाली अाहे.

अायातीवरील परावलंबित्व कमी करण्यासाठी तसेच स्थानिक बाजारपेठेत डाळी अाणि खाद्यतेलाचा पुरेसा साठा उपलब्ध हाेण्याच्या दृष्टीने उत्पादनाला बळकटी िमळणे गरजेचे अाहे. डाळी, तेलबिया अाणि कडधान्यांच्या लागवडीखालील क्षेत्रफळात अातापर्यंत लक्षणीय वाढ झाली अाहे. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादन हाेण्याची अपेक्षा कृषिमंत्री राधामाेहन िसंग यांनी व्यक्त केली.

"इंडिया रेटिंग्ज'नी व्यक्त केला अंदाज
जर पाऊस अशाच प्रकारे चांगला पडत राहिला तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खरिपाचे उत्पादन सर्वाधिक हाेण्याचा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चनेदेखील व्यक्त केला अाहे. मागील वर्षात पाऊस कमी पडल्यामुळे खरिपातील उत्पादन घटून ते २०१३-१४ वर्षातील १२८.६९ दशलक्ष टनांवरून १२४.६० दशलक्ष टनांवर अाले हाेते. देशाच्या एकूण धान्य उत्पादनापैकी खरीप हंगामात अर्ध्याहून अधिक पेरण्या झाल्या अाहेत. जुलैच्या मध्यापर्यंत हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत ६३ टक्क्यांनी जास्त आहे.
पिके २०१४-१५ (जुलै ते जून) वर्ष २०१५- १६ (जुलै ते जून)
डाळी २.३९ दशलक्ष हेक्टर ५.५९ दशलक्ष हेक्टर
कडधान्य ४.७६ दशलक्ष हेक्टर १०.२४ दशलक्ष हेक्टर
तेलबिया ३.८ दशलक्ष हेक्टर १२.७ दशलक्ष हेक्टर
बातम्या आणखी आहेत...