आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटी’चा २०% दर उद्याेगांसाठी रास्त ठरेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संसदेच्या समितीने वस्तू अाणि सेवा करासाठी २० टक्के दर सुचवला असून ताे उद्याेग क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल तसेच ग्राहकांवर त्यामुळे भार येणार नाही, असे मत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यक्त केले अाहे. वस्तू अाणि सेवा कराचा कमाल दर हा २० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, अन्यथा पुढील वर्षाच्या एक एप्रिलपासून लागू हाेणाऱ्या या प्रस्तावित नवीन अप्रत्यक्ष कराची अंमलबजावणी झाल्यानंतर महागाई तर भडकेलच, पण ग्राहकांचा अात्मविश्वासही कमी हाेईल, असे राज्यसभेच्या निवड समितीने म्हटले अाहे. हा २० टक्के दरापेक्षा जास्त नसावा अाणि कमी केल्यास ताे १४ टक्के असावा असे म्हटले अाहे.