आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीएसटीसाठी हिवाळी अधिवेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बिल मंजूर करण्यासाठी सरकारच्या वतीने लवकरच हिवाळी अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. मात्र, इतर राजकीय पक्षांसोबत यावर सहमती बनण्यावर ते अवलंबून राहणार आहे. संसदीय कार्य आणि शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी ही माहिती दिली. कोलकाता येथे स्मार्ट सिटीवर आधारित एका कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राजकीय पक्षांसोबत सहमती झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचे नायडू यांनी सांगितले. विरोधी पक्ष कोळसा आणि खनन बिलाच्यादेखील विरोधात होते. मात्र, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते या बिलाचे समर्थन करण्यास तयार झाले होते.

राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाने जीएसटीला निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केेली होती. सरकारच्या वतीने ही मागणी मान्य करण्यात आली आहे. समितीनेदेखील काम पूर्ण करून त्यांचा अहवाल राज्यसभेत सादर केला आहे. मात्र, आता काँग्रेस याच्याशी काहीही संबध नसलेले कारण पुढे करत आहे.

(फोटो : कार्यशाळेत चर्चा करताना संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू व राज्यमंत्री बाबुल सुप्रियो.)