आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • GST Bill Will Be In Parliament In Two Days : Jeitley

जीएसटीचे विधेयक दोन दिवसांत संसदेत मांडणार : अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या चालू अधिवेशनातच वस्तू व सेवा कर (जीएसटी) विषयक घटनादुरुस्ती विधेयक संमत करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे एक एप्रिल २०१६ पासून देशात नवी अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू करण्याचा मार्ग सुकर होईल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी ही माहिती दिली.
यासंदर्भात १८ राज्यांतील अर्थमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले, राज्यांनी एकमताने जीएसटीला पाठिंबा दिला आहे. हे सर्वांसाठी फायद्याचेे आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात हे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे. काही राज्यांनी किरकोळ दुरुस्त्या सुचवल्या आहेत. काही राज्यांनी त्यांच्या फायद्याबाबतचे मुद्दे मांडले आहेत. जीएसटीबाबतच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी एक कार्यकारी समिती नेमण्यात आली आहे. यामुळे जीएसटीची अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. लोकसभेत जीएसटीवर चर्चा करण्यासाठी काही दिवसांत नोटीस देणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.

पुढे काय?
जीएसटीबाबत घटनादुरुस्ती विधेयक मागील वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेत सादर करण्यात आले आहे. आता संसदेत त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी त्याला पटल कार्यसूचीत समावेश करण्याची नोटीस देण्यात येईल. हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोनतृतीयांश बहुमतासह ते संमत होणे आवश्यक अाहे. त्यानंतर त्यास निम्म्या राज्यांची मान्यता मिळणे आवश्यक आहे.

तामिळनाडूमुळे घोडे अडले
जीएसटी विधेयकावर जवळपास सर्व राज्यांची सहमती आहे. मात्र, तामिळनाडूने अधिकारप्राप्त समितीत वास्तविक कर आणि करकक्षा यावर एकमत होत नाही तोवर संसदेत हे विधेयक सादर करण्यावर आक्षेप घेतला असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.

जीएसटी आहे तरी काय?
जीएसटीअंतर्गत देशभरात एकाच दराचे कर लागू होतील. केंद्रीय उत्पादन शुल्क, राज्यांतील मूल्यवर्धित कर (व्हॅट), मनोरंजन कर, जकात, प्रवेश कर आणि वस्तू व सेवांवर लागणा-या विविध करांची जागा जीएसटी घेईल. थोडक्यात सांगायचे झाले तर अप्रत्यक्ष करांसाठी एकच दराने कर लागू होईल.

जीएसटीचे फायदे
जीएसटीमुळे वस्तू व सेवांची एका राज्यातून दुस-या राज्यात ने-आण करणे सुलभ होईल आणि इन्स्पेक्टर राजला आळा बसेल.