आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीने घरखर्चात 30% वाढ झाल्याचे अनेकांचे मत; सामान्य ग्राहकांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मुळे उत्पादक आणि व्यापाऱ्यांना झालेला फायदा त्यांनी सामान्य ग्राहकांना दिला नसल्याचे मत अनेक लोकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या नव्या कर प्रणालीनंतर त्यांच्या महिन्याच्या खर्चात वाढ झाली आहे. या दरम्यान कर कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना भेटला की नाही हे तपासण्यासाठी दोनसदस्यीय समिती बनवण्याची घोषणा हरियाणा सरकारने केली आहे. जीएसटी कायद्याच्या कलम १७१ नुसार करात कपात झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ऑनलाइन सिटिझन प्लॅटफॉर्म लोकलसर्किल्सच्या सर्व्हेमध्ये सहभाग घेतलेल्या ५४ टक्के लोकांनी जीएसटी लागू झाल्यानंतर त्यांचा खर्च ३० टक्के वाढला असल्याचे सांगितले आहे. तर नव्या कर प्रणालीचा कोणताच परिणाम झाला नसल्याचे २० टक्के लोकांनी सांगितले. स्वयंपाकासाठीच्या खर्चाबाबत ५१ % लोकांनी खर्च वाढला असल्याचे, ७ टक्क्यांनी कमी झाल्याचे, तर २६ टक्के लोकांनी पहिल्याप्रमाणेच खर्च असल्याचे सांगितले आहे. 
बातम्या आणखी आहेत...