आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन खरेदीवरही वस्तू सेवा कर; माॅडेल जीएसटी कायद्याला मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्व ऑनलाइन खरेदीवर वस्तू सेवा कर (जीएसटी) लागणार आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून लागू होणाऱ्या संभाव्य जीएसटीनंतर हा कर लागेल. जीएसटीसंदर्भात सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत माॅडेल जीएसटी कायद्याला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांनी जीएसटीला पाठिंबा दर्शवला आहे.
महसूल सचिव हसमुख अधिया यांना सांगितले, जीएसटी मॉडेल कायद्यात १६२ कलमे परिशिष्टे आहेत. या कायद्याचा भंग केल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास दंडाची तरतूद आहे. दरम्यान, सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत तामिळनाडू वगळता सर्व राज्यांनी जीएसटीला पाठिंबा दर्शवल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कायद्यानुसार राज्यात वार्षिक ५० लाख रुपयांपेक्षा एखाद्याची वस्तू विक्री सेवा असेल तर त्यावर किमान १% कराची तरतूद यात आहे.