आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • GST Will Make India Single Largest Market Globally: Railways Minister Suresh Prabhu

जीएसटीमुळे भारत ठरेल मोठी बाजारपेठ : सुरेश प्रभू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तूआणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यास भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनेल, असे मत व्यक्त करत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जीएसटीचे समर्थन केले. मंगळवारी उद्योग मंडळाच्या (फिक्की) वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी प्रभू म्हणाले की, सरकारने जीएसटीच्या माध्यमातून चांगले पाऊल उचलले आहे. मात्र, ही नाण्याची एक बाजू आहे आणि दुसरी बाजू इतर पक्ष, मित्र आणि सहकारी पूर्ण करतील. ज्यामुळे भारतासारखी सर्वात मोठी बाजारपेठ तयार होण्यासाठी मदत मिळेल. यात १.२५ अब्ज ग्राहक असतील, ज्यामुळे भारत इतर बजारपेठांसोबत स्पर्धा करेल, असेही प्रभू यांनी सांगितले. जीएसटी लागू करण्यासंदर्भातले संविधान संशोधक विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झाले आहे. मात्र, राज्यसभेतील काँग्रेसच्या विरोधामुळे हे विधेयक विषय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांचा विरोध
नवी दिल्ली | वस्तूआणि सेवा कराबाबत विरोधी पक्षांबरोबरच आता व्यापाऱ्यांनीही विरोध केला आहे. सध्या या विधेयकाचे असलेले स्वरूप आणि त्यासोबत असलेले संविधान संशोधन व्यापाऱ्यांना मान्य नाही. अखिल भारतीय व्यापारी महासंघ (कॅट) च्या वतीने मंगळवारी यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले. ज्यात दोनस्तरीय करव्यवस्थेला विरोध करत एकच स्तर करव्यवस्था असावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परिपत्रकानुसार यात केंद्र आणि राज्य, अशा दोन पद्धतींनी जीएसटीची तरतूद आहे. याव्यतिरिक्त आंतरराज्य व्यापारावर आयजीएसटी लागणार आहे.