आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गार्डियनचे १००% व्याजमुक्त घर आता येणार औरंगाबादकरांच्या भेटीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुणेस्थित गार्डियन डेव्हलपर्स या रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासार्ह आणि नावाजलेल्या कंपनीने गेल्यावर्षी बांधकाम क्षेत्रात प्रथमच आणलेल्या १००% व्याजमुक्त घरांच्या योजनेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाने उत्साहित होऊन पुण्याबाहेरील ग्राहकांसाठी प्रथमच ही योजना उपलब्ध करून दिली जात आहे. येत्या १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान रेल्वे स्टेशन रस्ता येथील हॉटेल व्हिटस येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत या योजनेअंतर्गत भव्य गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर आणि लगतच्या परिसरात असणाऱ्या उत्कृष्ट लोकेशन्सवर घर खरेदीचे उत्तम पर्याय यामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार असून या योजनेअंतर्गत सादर होणाऱ्या सर्व गृहप्रकल्पांना लागणाऱ्या सर्व परवानग्या याआधीच मिळाल्या आहेत.
योजनेविषयी बोलताना गार्डियन डेव्हलपर्सचे अध्यक्ष मनीष साबडे म्हणाले, “मर्यादित काळासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारे व्याज न देता घराचे स्वप्न साकारता येणार आहे. १००% व्याजमुक्त घरांच्या या योजनेअंतर्गत ग्राहकांना फक्त एक लाख रुपये भरून प्रदर्शनात सदनिका बुक करता येणार आहे. या योजनेचे बुकिंग www.guardiandevelopers.in या संकेतस्थळावर देखील करता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...