आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बाजाराचा आढावा: कापसाला भाव देत गुजरातच्या व्यापाऱ्यांची बाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- यंदा निसर्गाने साथ दिल्याने पिके जाेमात अाली असली तरी बाजारात मात्र उठाव नाही. अावक जास्त असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन जास्त झाल्याने मटकी वगळता सर्व अन्नधान्याच्या दरात कमालीची घसरण झाली अाहे. अाडत बाजारात मंदीचे वारे अाहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये बाजारात चांगली अावक अाणि व्यवहार हाेत असतात. परंतु सध्या मागणी नसल्याने व चलन तुटवड्यामुळे बाजारात मजा नाही, अशा प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत अाहेत.  तर दुसरीकडे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कापसाला चांगला भाव दिला आहे. जागतिक बाजारात सध्या कापसाला चांगली मागणी असून त्याचा फायदा तेथील व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मागील वर्षी ३८०० रुपयांपर्यंत विकलेल्या सोयाबीनला यंदा २७५० रुपये क्विंटल भाव मिळाला. मागील वर्षी तुरीचा ताेरा ९ हजार रुपयांपर्यंत पोहोचला हाेता, परंतु यंदा ५ हजार ५० रुपये हमी भाव सरकारने जाहीर केला अाहे.  शासनाच्या केंद्रावर हमी भावात खरेदीला अद्याप वेग अालेला नाही. शेतकऱ्याच्या तुरीची चाळण करून ग्रेड ठरल्यानंतर खरेदीचे सोपस्कार सुरू हाेतात. प्रमाणाबाहेर अार्द्रता असेल तर खरेदीला नकार मिळताे.  त्यानंतरच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांना ताबडतोब रक्कम मिळत नाही. खुल्या बाजारात तुरीला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये भाव मिळत अाहे. खुल्या बाजारात मिळणाऱ्या भावातील तफावत लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्राकडे अाहे. या केंद्रांवर तत्परतेने खरेदी-विक्री प्रक्रिया झाल्यास अावक वाढू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. मुगाचे भाव गतवर्षी ८ ते ९ हजार रुपये क्विंटलपर्यंत हाेते. अाज बाजारात ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत अाहे.

साेयाबीनच्या दरात तेजीचे संकेत  
मागील दाेन आठवड्यांत साेयाबीनमध्ये क्विंटलमागे ७५ ते १०० रुपयांची तेजी अाली. सध्या मागणीअभावी भाव स्थिर अाहेत. परंतु आगामी दिवसांत साेया मिलकडून मागणीची शक्यता अाहे. आंतरराष्ट्रीय बाजार पाहता यात क्विंटलमागे २०० रुपयांच्या तेजीचे संकेत अाहेत. 

पेंड, सरकीमध्ये २५० रुपयांची तेजी   
काॅटन बफर स्टाॅकचा अंदाज येत नसल्याने अाडत बाजारात पेंडचे भाव दर्जानुसार २१०० ते २२०० रुपयांपर्यंत हाेते, तर सरकीचे भाव २५०० रुपये क्विंटल हाेते. मागील दाेन आठवड्यांत पेंड अाणि सरकीमध्ये क्विंटलमागे २५० रुपयांची तेजी अाली.  

नाेटाबंदीनंतर जुन्या नाेटांमध्ये पाच हजार, तर धनादेशाने ४ हजार २०० रुपये दराने कापूस खरेदी झाली. त्यानंतर इकडच्या व्यापाऱ्यांच्या तुलनेत गुजरातच्या व्यापाऱ्यांनी स्पर्धात्मक जादा भाव देत खरेदी सुरू ठेवली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे संकेत दिसत असल्याने कापसाला ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये क्विंटल भाव मिळत अाहे. 
- बाबूराव देवडकर, कापूस व्यापारी.
बातम्या आणखी आहेत...