आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्खलीत इंग्लिशमध्ये ग्राहकांशी संवाद साधते ही महिला, रस्त्यावर विकते \'छोले-कुल्चे\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव- दिल्ली-एनसीआर भागात 'छोले-कुल्चे'चे अनेक गाड्या दिसतात. पण, गुडगावच्या सेक्टर 14 मध्ये रस्त्याच्या कडेला गाडी लावणार्‍या एका महिलेची कहाणी 'जरा हटके' आहे. फर्राटेदार इंग्लिशमध्ये ग्राहकांशाी संवाद साधणारी उर्वशी यादव ही ग्रॅज्युएट आहे. कुटुंबासाठी तिला हे करावे लागत आहे. उर्वशीची कहाणी आता सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे.

उर्वशीला का लावावी लागते 'छोले-कुल्चे'ची गाडी...?
- उर्वशी आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबातील असून तिने आर्ट्‍समध्ये ग्रॅज्युएट केले आहे.
- तिचे पती एका खासगी कंपनीत काम करत होते. एका अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
- डाॅक्टरांनी मोठी सर्जरी करण्यास सांग‍ितले आहे. अपघातानंतर उर्वशीच्या पतीने नोकरी सोडली. नंतर कुटुंबाचा गाडा चालणार कसा? या चिंतेत उर्वशी होती.
- तिने गुडगावच्या सेक्टर 17 मध्ये छोले-कुल्चेची गाडी सुरु केली.

बिझनेससोबत फॅमिलीचीही घेते काळजी...
- उर्वशीला दोन मुले असून दोघांचे शिक्षण सुरु आहे.
- उर्वशी पहाटे लवकर उठून मुलांना शाळेसाठी तयार करते. नंतर पतीला चहा- नाश्ता दिल्यानंतर ओल्ड दिल्लीरोडवर सेक्टर-14 जवळ ती छोले-कुल्चेची गाडी लावते.
- छोटे रेस्तराँ सुरु करण्याची इच्छा उर्वशीने व्यक्त केली आहे.
- उर्वशीचे टेस्टी छोले-कुल्चे बनवते, असे ग्राहक सांगतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फर्राटेदार इंग्लिशमध्ये ग्राहकांशी संवाद साधणार्‍या उर्वशी यादवचे इतर फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...