भारतात हॉलमार्किंग प्रणालीत चूका असल्याचा धक्कादायक खुलासा वर्ल्ड गोल्ड काउंसिलने केला आहे. यापूर्वी 'दैनिक भास्कर'ने भारतीय बाजारात हॉलमार्कचे सोने-चांदीचे दागिने शुद्ध नसल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच हॉलमार्किंग प्रणाली प्रचंड चूका असल्याचेही निर्दशनास आणून दिले होते.
नवी दिल्ली- भारतात हॉलमार्क सोन्याचे दागिन्यांची शुद्धता विश्वासपात्र नसल्याचे वर्ल्ड गोल्ड काउंसिलने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे हॉलमार्किंग सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असताना विना हॉलमार्किंग दागिन्यांचे काय? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हॉलमार्किंग दागिने देशातील फक्त मोठ्या शहरात मिळतात. मात्र, छोट्या शहरात किंवा गावांमध्ये विना हॉलमार्किंग दागिने विक्री केले जातात.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार, भारतातील हॉलमार्कचे दागिन्यांची शुद्धता 'ग्लोबल स्टँडर्ड'सारखी नाही.यामुळे अनेक देशांचा भारतातील सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेवर विश्वास राहिलेला नाही. त्याचा सरळ परिणाम निर्यातीवर झाला आहे.
भारतात 30 टक्क्यांपेक्षा कमी हॉलमार्कचे दागिने आहेत. विशेष म्हणजे भारतातील हॉलमार्कचे सोने 100 टक्के शुद्ध नाही. देशात जवळपास 4 लाख दागिने हॉलमार्किंग आहेत. हॉलमार्किंग प्रणालीत प्रचंड चूका असल्यामुळे भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएसआय) नियमावलीत ते खरे उतरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हॉलमार्कच्या दागिन्यांवर हे पाच शिक्के असणे गरजेचे...