आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD DSK: पाहा घराला घरपण देणार्‍या माणसाचं नैसर्गिक सौंदर्याने नटलेले घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला मोठं व्हायचं असेल तर मोठी माणसं कशी 'मोठी' झाली, हे आधी समजून घेणे महत्त्वाचे असते. मोठी स्वप्न पाहाण्यासाठी आपल्याला मोठं मन असावं लागतं. आपल्यात संयम, जिद्द असावी लागते. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे दीपक सखाराम कुलकणी म्हणजेच डीएसके पुण्यातील अर्थात सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, यशस्वी उद्योजक, समाजसेवक, कलाप्रेम व दानशूर डी.एस.कुलकर्णी.

'घराला घरपण देणारी माणसं' अशी ओळख असणार्‍या डीएसके यांचा आज (28 जून 1950) वाढदिवस. डीएसके यांनी चणे-फुटाणे विकून, गाड्यांच्या काचा पुसून शून्यातून विश्व निर्माण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे डीएसके यांनी आपल्या घराचे घरपण देखील अत्यंत कलात्मक पद्धतीने जपले आहे. हिरवागार डोंगर, खळखळणारे झरे आणि डोळ्यांना सुखद अनुभूती देणार्‍या झाडा-झुडपांच्या सानिध्यात साकारलेले डीएसकेंचे घर प्रत्यक्ष स्वप्ननगरीच भासते.

तब्बल 40 हजार पुणेकरांना हक्काचे घर दिल्यानंतर त्यांनी बांधलेल्या स्वत:च्या घरातील कोपरा न कोपरा वैविध्यपूर्ण आहे. जगातील विविध भागातून संग्रहित केलेल्या वस्तूमुळे त्यांचे घर पुण्याची नवी ओळख ठरत आहे.

पुण्यातील दीपक कुलकर्णी मराठी उद्योजकामधील मानाचे नाव. सर्वसामान्य व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत अनेकांचे घराचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. पुणे, मुंबई आणि नाशकातच नव्हे तर सातासमुद्रापार अमेरिका आणि सिंगापूरमध्ये त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. दुसर्‍यांच्या घराला घरपण देणार्‍या डीएसके यांनी स्वत:चे घर उभारताना नाविण्य जपण्याचा प्रयत्न केला. 10 वर्षाच्या परिश्रमाने त्यांनी डोंगराच्या कुशीत तब्बल एक एकरावर स्वप्ननगरी उभारली आहे.

सुरुवातीचे दिवस काढले भाड्याच्या घरात...
आज हजारो लोक डीएसकेच्या प्रकल्पात राहत असल्याचे अभिमानाने सांगतात. मात्र, कुलकर्णी यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात किरायाच्या घरात राहून केली. 10 वर्षापेक्षा जास्त काळ ते पुण्यात किरायाच्या घरात राहिले. या काळात त्यांनी अत्यंत खडतर दिवस पाहिले. चणे-फुटाने विकले, कारच्या काचा पुसल्या. कालातंराने जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहार सुरू केले. नंतर लहान सहान बांधकामे करू लागले. हे बांधकाम करत असतानाच ते आपल्या स्वप्नातील घराचे आराखडे तयार करत होते.

डीएसके यांची स्वप्ननगरी पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर करा क्लिक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...