आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HDFC मध्ये मॅक्स लाइफचे विलीनीकरण; सर्वात मोठी खासगी जीवन विमा कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एचडीएफसी स्टँडर्ड लाइफमध्ये मॅक्स लाइफ इन्शुरन्स आणि मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील चर्चा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय या तिन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी घेतला. असे विलीनीकरण झाले तर देशातील विमा क्षेत्रात ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना ठरेल. वास्तविक त्यासाठी आधी शेअरधारक, नियामक आणि न्यायालयाची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

या विलीनीकरणानंतर एचडीएफसी लाइफ एक लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह देशातील सर्वात मोठी खासगी विमा कंपनी होईल. खासगी विमा कंपन्यांमध्ये सध्या फक्त आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सची मालमत्ता व्यवस्थापनाअंतर्गत (एयूएम) एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या विलीनीकरणानंतर एचडीएफसी लाइफचा प्रीमियम संग्रह २६,००० कोटी रुपयांच्या जवळपास होईल. बाजारातील व्हॅल्यू ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि भागीदारी १२.४ टक्के होईल. सध्या जीवन विमा क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी असलेल्या आयसीआयसीआयची बाजारातील व्हॅल्यू ३२,५०० कोटी रुपये आणि भागीदारी ११.३ टक्के आहे.

एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ ही एचडीएफसी समूहाची कंपनी असून तीचे दीपक पारेख अध्यक्ष आहेत. मॅक्स लाइफ इन्शुरन्स ही मॅक्स समूहाची कंपनी आहे. या कंपनीचे अनलजित सिंह संस्थापक आहेत. एचडीएफसीची २०१५-१६ मध्ये प्रीमियम १६,३१३ कोटी, तर एयूएम ७४,२४७ कोटी रुपये होता. मॅक्स लाइफ इन्शुरन्सचा २०१५-१६ मध्ये प्रीमियम ९,२१६ कोटी तर एमयूएम ३५,८२४ कोटी रुपये होता.

सर्वाधिक भागीदारी एलआयसीची
एचडीएफसीची साधारण विमा कंपनी एचडीएफसी अॅर्गोने याच महिन्यात एल अँड टी जनरल इन्शुरन्सला ५५१ कोटी रुपयांत विकत घेत असल्याची घोषणा केली होती. भारतात सध्या विमा कंपन्यांमध्ये ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. देशात सध्या २४ विमा कंपन्या आहेत. २५ लाख कोटी रुपयांच्या या क्षेत्रात ७० टक्के भागीदारी ही एकट्या एलआयसीची आहे.

शेअर वधारला
एचडीएफसी स्टँडर्ड लाइफमध्ये मॅक्सच्या विलीनीकरणाची बातमी येताच शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये २० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली. दिवसभराच्या व्यवहाराच्या शेवटी मात्र याचे शेअर १०.२९ टक्क्यांच्या वाढीसह ४७२.८० रुपयांवर बंद झाले. कंपनीची व्हॅल्यूएशन १,१८० कोटी रुपयांनी वाढून १२,६२५ कोटी रुपये झाले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...