आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Dropped Out Of School In Class Nine Now He Runs Two Companies

9 वीत दोनवेळा नापास झाला, आज वयाच्या 16 व्या वर्षी आहे दोन कंपन्यांचा मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः अंगद दरयानी

9 वीत दोनदा नापास झाला होता. तेव्हा त्याचे वय होते केवळ 14 वर्षे. यानंतर केवळ दोनच वर्षात म्हणजेच वयाच्या 16 व्या वर्षी तो दोन कंपन्यांचा मालक झाला. आम्ही ही काही चमत्कारीक कथा सांगत नाही आहोत. तर ही सत्यकथा आहे. ही सक्सेस स्टोरी आहे मुंबईत राहाणाऱ्या अंगद दरयानी याची. अपार कष्ट आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द या महत्त्वाकांक्षेने अनेकांना यशाच्या उत्तूंग शिखरावर पोहोचवले आहे. नुकतेच फेसबुक पेज 'Humans of Bombay' यावर अंगदची सक्सेस स्टोरी खुपच लोकप्रिय झाली होती. आज आम्ही त्याने इतक्या कमी वेळात हे मोठे यश कसे मिळवले याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

जगण्यातून शिकणे आवडत होते, यामुळे सोडली शाळा
अंगदने शाळा याकरिता सोडली कारण त्याला जीवनाकडून शिकण्यात जास्त मजा वाटत होती. अंगदने फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा मी 9 वीच्या वर्गात होतो तेव्हा मी शाळा सोडली. कारण मला वारंवार जुन्या कन्सेप्ट शिकणे आवडत नव्हते. त्याच्यामते शालेय शिक्षणामध्ये मुले नवीन कल्पनांवर विचार करू शकत नाहीत. पुस्तकात दिलेल्या रटाळ गोष्टी पाठ कराव्या लागतात. ज्या नंतर विद्यार्थी विसरूनही जातात. अंगद नववीत दोनवेळा नापास झाला होता.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोण आहेत अंगदचे आदर्श...