स्मार्टफोन युजर्सला अक्षरशः वेड लावणार्या व अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या 'कँडी क्रश' गेमची निर्माता कंपनी 'किंग डिजिटल'ला एक्टिव्हिजन ब्लिजार्ड (Activision Blizzard) कंपनीने टेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये 590 कोटी रुपयांचे डील झाल्याची माहिती मिळाली आहे.
एक्टिव्हिजन ब्लिजार्डने जाहीर केलेली माहिती अशी की, किंग डिजिटल एंटरटेनमेंट 'द होम ऑफ कँडीक्रश सागा'च्या टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण केली आहे. किंग डिजिटलच्या ग्लोबल रीचला आणखी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
फेसबुकवरील रिक्वेस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला 'कॅंडी क्रश' गेम भारतात खूप लोकप्रिय झाला आहे. मात्र, कॅंडी क्रश हा गेम कॉपी केलाला आहे, हे कदाचित तुम्हाला माहीत नसावे. आज आम्ही आपल्याला 'कॅंडी क्रश'चा इतिहास घेवून आलो आहे.
'बेज्वेल्ड'ची हुबेहुब कॉपी 'कॅंडी क्रश''कॅंडी क्रश' हा पॉप्युलर गेम बेज्वेल्डची (Bejeweled) हुबेहूब कॉपी आहे. मोबाइल गेमिंग मार्केटमध्ये कॅंडी क्रश आधी 'बेज्वेल्ड डॉमिनेंट गेम' उपलब्ध होता. यामुळे कॅंडी क्रश हा गेम बेज्वेल्डची कॉपी असल्याचा आरोप केला जातो. दरम्यान, मोबाइल गेमिंग मार्केटमध्ये 'बेज्वेल्ड' गेम खूप पॉप्युलर आहे. PopCap कंपनीने बेज्वेल्ड गेमची निर्मिती केली आहे.
PopCap चे फाउंडर जॅसन कापल्का यांच्या मते, सन 2000 मध्ये बेज्वेल्डचे जगभरात सुमारे पाच लाखांहून जास्त (500 मिलियन) यूजर्स होते. 'match-three' पझल बेस्ड व्हिडिओ गेम असून त्याला कॉपी करून 'किंग डिजिटल'ने 'कॅंडी क्रश' नाव दिले. आता हा गेम दररोज लाखों युजर्स डाउनलोड करतात, इतका हा गेम लोकप्रिय झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कॅंडी क्रशला म्हटले जाते 'कॉपी कॅट'...