आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल असो वा बाइक, भारतात पहिल्या क्रमांकावर आहे ही कंपनी.....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
९२ वर्षीय बृजमोहनलाल मुंजाल यांनी आता कंपनीचा सर्व कारभार मुलगा पवन मुंजाल यांच्या स्वाधीन केला, तरीही ठेवतात कामावर बारीक नजर.
सायकल असो वा बाइक, हीरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांच्या प्रत्येक सेग्मेंटमध्ये धुमाकूळ घातला. १९८४ मध्ये सुरू झालेल्या या हीरो मोटोकॉर्पचे तेव्हापासून आतापर्यंत निव्वळ मूल्य (नेटवर्थ) ५५९९ कोटींचा आकडा पार करून गेले आहे. अनेक चढ उतार आले. मात्र कंपनीची घोडदौड सुरूच होती. आतापर्यंत या कंपनीच्या विकासात अनेकांनी आपला घाम गाळला आहे. आता या कंपनीला नवा हीरो मिळाला आहे. या कंपनीच्या स्थापनेपासून तिचे चेअरमन आणि प्रबंध निदेशक असलेले ९२ वर्षीय बृजमोहनलाल मुंजाल यांनी आता कंपनीचा सर्व कारभार त्यांचा मुलगा पवन मुंजाल यांच्या स्वाधीन केला आहे. त्यांनी कार्यकारी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र बृजमोहनलाल मुंजाल तरीही सर्व कामकाजावर नजर ठेवून आहेत.
पाकिस्तानवरून आले होते मुंजाल

बृजमोहनलाल मुंजाल यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात असे स्वप्न पाहिले होते की, प्रवासाच्या क्षेत्रात आपण असे माध्यम उपलब्ध करून द्यावे, ज्यामुळे गरिबांना ते घेणे शक्य होईल. त्यांच्या भावाने त्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. मुंजाल यांनी सायकल उद्योग सुरू केला आणि ही सायकल गरिबांचे वाहन बनली. यानंतर बृजमोहन मुंजाल यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पाकिस्तानच्या कमालिया (आता हे शहर पाकिस्तानात आहे) येथे मुंजाल यांचा जन्म झाला. १९४४ मध्ये मुंजाल हे २० वर्षांचे असताना ते त्यांचे तीन भाऊ दयानंद, सत्यानंद आणि ओमप्रकाश यांच्यासोबत पाकिस्तानच्या कमालिया येथून अमृतसरला आले. अमृतसरमध्ये मुंजाल हे छोटे मोठे काम करत राहिले. येथून मग ते त्यांच्या भावांसोबत लुधियानाला गेले. तेथे त्यांनी सायकलच्या स्पेअरपार्टचा उद्योग सुरू केला. १९५४ मध्ये स्पेअरपार्ट विकण्याऐवजी सायकलचे हँडल, फोर्क इत्यादी सामान बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी हीरो सायकल्स लिमिटेड नावाने कंपनी सुरू केली. १९५६ मध्ये पंजाब सरकाराने सायकल बनवण्याचा परवाना देण्यास सुरुवात केली आणि हा परवाना मुंजाल यांच्या कंपनीला मिळाला. या सायकल परवान्यासोबतच त्यांचे आयुष्य बदलून गेले. सरकारकडून ६ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मुंजाल यांनी जमा केलेली रक्कम यांच्या साह्याने हीरो कंपनी सुरू झाली. त्यावेळी कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता ७,५०० सायकल एवढे होते. त्यानंतर १९८६ ला हीरो सायकलला जगातील सर्वात मोठी सायकल कंपनी म्हणून घोषित केले.

ग्राहकाची नस ओळखा
मुंजाल एकदा तांत्रिक माहिती घेण्यासाठी जर्मनीला गेले होते. तिथे जी व्यक्ती त्यांना घ्यायला आली होती, त्या व्यक्तीने विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत मुंजाल यांना गीताचे श्लोक ऐकवले, सोबतच ते ठिकाणही दाखवले जेथे सायकल बनवत होते. त्याला माहीत होते की, त्याला भेटायला जी व्यक्ती आली आहे ती भारतीय आहे, त्यासाठी त्याने वेगळी तयारी केली होती. खरं म्हणजे यशस्वी उद्योजक होण्यासाठी ग्राहकांच्या विचारांना, गरजांना पकडावे लागते. हीरो ग्रुपने याच मंत्राला चांगल्याप्रकारे समजून घेतले आहे. त्यामुळेच ती आज जगातील दुचाकी उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
बृजमोहनलाल भारतातील ३८ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती
हीरो समूहाचे चेअरमन बृजमोहनलाल मुंजाल यांनी अपार कष्टाने आणि त्यांच्या दूरदृष्टिकोनाने ते करून दाखवले, ज्याचे लोक स्वप्नच पाहतात. मुंजाल यांच्या कठीण परिश्रमामुळे त्यांच्या टू-व्हिलर कंपनीला जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनवले आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये जाहीर झालेल्या फोर्ब्स यादीनुसार मुंजाल यांच्याजवळ २३३१० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते भारतातील ३८वे सर्वात श्रीमंत व्यक्ती अाहे.

असा झाला टू-व्हीलरचा प्रवास
यानंतर त्यांनी एक टू-व्हीलर कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव होते हीरो मॅजेस्टिक कंपनी. यामध्ये त्यांनी मॅजेस्टिक स्कूटर बनवण्यास सुरुवात केली. १९८४ मध्ये त्यांनी जपानची सर्वात मोठी ऑटो कंपनी होंडासोबत करार केला आणि येथूनच त्यांनी जगाच्या बाजारात उडी घेतली. हीरोने होंडासोबत हरियाणाच्या धारूहेडा येथे एक मोठा प्लांट उभा केला.१३ एप्रिल १९८५ ला हीरो-होंडाची पहिली बाइक सीडी 100 बाजारात आली.
इतरांपेक्षा वेगळी आहे काम करण्याची पद्धत
बृजमोहनलाल मुंजाल म्हणतात, कोणत्याही उद्योगाला वाढवण्यासाठी एका चांगल्या आणि कष्टाळू टीमचे असणे आवश्यक आहे. कारण, कोणतेही व्यावसायिक ध्येय गाठण्यासाठी ६०-७० टक्के योगदान हे टीमवर्कचेच असते. ते म्हणतात, मी दर आठवड्याला माझ्या मुलाला हे सांगायला विसरत नाही, की तू तुझ्या कर्मचाऱ्यांशी आणि डिलर्ससोबत संबंध घट्ट ठेव. त्यांनी त्यांच्या ४० डिलर्सला मोठ्या उद्योगात बदलले आहे आणि त्यांच्या मुलांनी त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन या आकड्यांना दुप्पट- तिप्पट वाढवले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा,