आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायर इंडियाचा पहिला औद्योगिक पार्क पुण्यात, उत्पादन क्षमतेत वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- घरगुती उपकरणे व उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स कंपनी हायर इंडियाने गुरुवारी पुण्यातील रांजणगावमध्ये औद्योगिक पार्कचा शुभारंभ केला आहे. भारतात कंपनीचा हा पहिलाच औद्योगिक पार्क आहे. यावर सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पामुळे दाेन हजार नवीन रोजगार निर्मिती होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

याव्यतिरिक्त १०,००० अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. या प्रकल्पातील काम क्षमतेप्रमाणे सुरू झाल्यावर रेफ्रिजरेटरची उत्पादन क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढून १८ लाख युनिट वार्षिक होईल. याव्यतिरिक्त येथे एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, वॉटर हिटर आणि एसीदेखील बनतील. या पार्कमध्ये दरवर्षी विविध उत्पादनांचे ३८ लाख युनिट बनवले जातील. म्हणजेच सध्याच्या तुलनेत ३२२ टक्के जास्त. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हायर समूहाचे कार्यकारी संचालक लियांग हाइशान आणि हायर अलायन्सेस इंडियाचे एमडी सोंग युजुन उपस्थित होते. राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. भारत हायर समूहासाठी सर्वात मोठा स्ट्रॅटजिक बाजार बनला असल्याचे लियांग हाइशान म्हणाले. एमडी युजुन यांनी सांगितले की, “१३ वर्षांत हायर इंडियाची तेजीने वाढ झाली आहे. नव्या उत्पादक सवलतींमुळे भारतात हायरची उपस्थिती आणखी मजबूत राहील.’

बातम्या आणखी आहेत...