आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्ज हप्ता वर्षाकाठी ३,१३२ रुपयांनी स्वस्त, रेपो दरात अर्धा टक्का कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, औरंगाबाद- देशाच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी रेपो दरात अर्धा टक्का कपात करून सर्वांनाच सुखद धक्का दिला.
राजन यांच्या सकारात्मक पावलावर पाऊल ठेवत देशातील सर्वात मोठी कर्जदाती स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाचा व्याजदर ०.४ टक्क्यांनी घटवून ९.३० टक्क्यांवर आणला. यामुळे एसबीआयचे १० लाख रुपयांचे २० वर्षे मुदतीचे गृहकर्ज घेणाऱ्या कर्जदाराची वर्षाकाठी ३१३२ रुपयांची बचत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तीन वर्षांतील सर्वात मोठी कपात करत कर्ज स्वस्ताईचा चेंडू व्यापारी बँकांच्या कोर्टात टाकला आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर आता ७.२५ टक्क्यांवरून ६.७५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे बँकांना गृह, वाहन व इतर कर्जे स्वस्त करण्यास मोठा वाव आहे.

रिझर्व्ह बँकेकडून व्यापारी बँका ज्या दराने अल्प मुदतीचे कर्ज घेतात, त्या कर्जावरील व्याजदर अर्थात रेपो दरात कपात करण्याची सर्व क्षेत्रांतून मागणी होती. सातत्याने कमी होणारी महागाई, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीस विलंब आणि देशाच्या औद्योगिक क्षेत्रातून कर्ज स्वस्ताईची होणारी मागणी या बाबी लक्षात घेऊन रेपो दरात ०.५० टक्के कपातीचा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.

एसबीआयचे कर्ज व्याजदर ९.७० वरून ९.३० टक्के
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.५० टक्के कपात केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले कर्ज स्वस्त केले. एसबीआयने आपल्या कर्जाच्या मूळ दरात ०.४ टक्के कपात केली. आता एसबीआयच्या कर्जाचे व्याजदर ९.७० वरून ९.३० टक्क्यांवर आले. नवे व्याजदर पाच ऑक्टोबर पासून लागू होतील. याचा फायदा नव्या कर्जदारांसह सध्याच्या कर्जधारकांनाही होणार आहे. आंध्र बँकेनेही कर्जाचे मूळ दर ०.२५ टक्के कपातीसह ९.७५ टक्क्यांवर आणले आहेत.
असा होईल फायदा
एसबीआयने गृह, वाहन व इतर कर्जावरील व्याजदर ९.७० वरून ९.३० टक्क्यांवर आणला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जाचे मासिक हप्ते स्वस्त होऊन बचत होणार आहे. ती अशी :

पुढील स्‍लाइडवर वाचा होम लोनविषयी माहिती...