स्टॉकहोम- ही घटना २००६ ची आहे. स्वीडनचा फिलिप टायसेंड हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जगभ्रमंतीवर निघाला होता. ऑस्ट्रेलियात असताना त्याची भेट डॅनियल वेलिंग्टन या ब्रिटिश नौसैनिकाशी झाली. डॅनियलच्या हातात जगातील सर्वात महाग घड्याळापैकी एक रोलेक्स या कंपनीचे घड्याळ होते. त्याचा बँड ‘नाटो’ ब्रँडचा होता. फिलिपला हे घड्याळ खूप आवडले. पण रोलेक्स विकत घेण्याइतके पैसे नव्हते. यामुळे घड्याळाचाच व्यवसाय सुरू करण्याची त्याला कल्पना सुचली.
घरी परतल्यानंतर त्याने रोलेक्ससारख्या घड्याळांची ऑनलाइन विक्री सुरू केली. त्यातून १६ लाख रुपये जमवले. या पैशांतून त्याने २००९ मध्ये ‘डॅनियल वेलिंग्टन’ कंपनी सुरू केली. स्वत: कॉम्प्युटवर डिझाइन लोगो बनवला. ते नाटो वॉच बँड बनवणाऱ्या चीनी कंपनीला पाठवले. लवकरच बाजारात ‘डॅनियल वेलिंग्टन’ घड्याळे आली. दिसायला स्टायलिश अन् स्वस्तही. ती खूप लोकप्रिय झाली. फिलिपने सोशल मीडियावर त्याचे मार्केटिंग केले. आज इन्स्टाग्रामवर ‘डॅनियल वेलिंग्टन’चे २० लाखांवर फॉलोअर्स अाहेत. २०१४ मध्ये कंपनीने १० लाख घड्याळे विकली. तेव्हा एकूण उलाढाल ४७० कोटींची होती. वर्षभरात २०१५ मध्ये ती अडीच पटींनी वाढून ११४० कोटींवर गेली आहे. त्यात फिलिपचा नफा ४५० कोटी रुपये होता. गतवर्षी त्याने राजधानी स्टॉकहोममध्ये ८५ कोटींचा बंगला घेतला. कंपनी स्वीडिश असलीतरी दर कमी ठेवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्ये होते.
पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाला फिलिप टायसेंडर?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)