आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरांच्या किमती 30 % घसरणार, ‘प्राॅपइक्विटी’चे विश्लेषण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चलनातून १००० व ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. ऑनलाइन विश्लेषणातील लोकप्रिय प्रॉपइक्विटी यांंनी केलेल्या ताज्या विश्लेषणात देशातील प्रमुख ४२ शहरांतील घरांच्या किमती ३० टक्क्यांपर्यंत घसरतील असे निरीक्षण नोंदवले आहे. देशातील बांधकाम क्षेत्राला विशेषत: गृहनिर्माण क्षेत्राला चलन रद्दचा मोठा फटका बसणार असल्याचे प्रॉपइक्विटीने म्हटले आहे. येत्या सहा महिने ते वर्षभराच्या काळात घरे, फ्लॅट स्वस्त होतील, असेही स्पष्ट केले आहे.

प्रॉपइक्विटीच्या मते, गृहनिर्माण क्षेत्राला चलन रद्दचा जबरदस्त फटका बसणार
- देशातील ४२ प्रमुख शहरांतील विक्री झालेल्या व विक्री न झालेल्या अशा गृहनिर्माण क्षेत्राचे बाजारमूल्य ३० टक्क्यांनी घटून सध्याच्या ३९,५५,०४४ कोटी रुपयांवरून ३१,५२,१७० कोटींवर येईल.

- या ४२ शहरांत २००८ पासून विकलेल्या, विक्रीस तयार असलेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या घरांची संख्या ४९,४२,६३७ आहे.

- घरांचे मूल्य घसरणीचा सर्वाधिक फटका मुंबईला बसणार असून मुंबईतील घरांचे बाजारमूल्य २,००,३३० कोटी रुपयांनी तर बंगळुरूत ९९,९८३ कोटी रुपयांनी घटणार आहे.

- देशाचे बांधकाम क्षेत्र सध्या सब-प्राइम संकट पातळीत असून चलन रद्दमुळे रिअल इस्टेटच्या गाभ्यालाच धक्का बसला आहे.

चेकने व्यवहार; ५ पैकी एकाची तयारी
चलन रद्दचा निर्णय व निर्बंधामुळे घरे, फ्लॅटच्या रिसेलवरही परिणाम जाणवत आहे. पाच जणांपैकी केवळ एकच जण चेकद्वारे व्यवहारास तयार असल्याचे चित्र आहे. लोकांना किमान २० ते ३० टक्के रक्कम रोकड स्वरूपात हवी आहे. - समीर जासुजा, सीईओ, प्रॉपइक्विटी.
बातम्या आणखी आहेत...