आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट जीएसटी बिल असे ओळखा, प्रत्येक दुकानदाराला नाही तुमच्याकडून टॅक्स घेण्याचा हक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जीएसटी संपूर्ण देशात आणि प्रत्येक प्रोडक्टवर लागू झाले आहे. पण प्रत्येक दुकानदार जीएसटी वसूल करु शकत नाही. गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स संदर्भात आजही मार्केटमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. पण असे होऊ नये की याचा फायदा उचलत एखादा दुकानदार किंवा रेस्ट्रोचा मालक तुमच्याकडून जीएसटी वसूल करेल. बऱ्याच दुकानदारांना याचा अधिकार नाही. कॉम्प्युटरमधून बिल काढून देत असतील तरी तुम्ही त्यांना हे विचारायलाच हवे.
 
दिल्लीतील चाटर्ड अकाऊंटंट रवी शंकर गुप्ता यांनी सांगितले, की जीएसटी रजिस्ट्रेशन केले आहे तोच दुुकानदार जीएसटी वसूल करु शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की बनावट सीएसटी बिल आणि जीएसटी क्रमांक कसा शोधून काढायचा. असे चुकीचे काम करणाऱ्याला कसे पकडायचे. तुम्ही केवळ तुमच्या मोबाईलने हे काम करु शकता.
 
तुम्हाला करावी लागतील ही दोन कामे
१- दुकानदाराला जीएसटी वसूल करण्याचा अधिकार आहे का हे चेक करणे
२- तो योग्य दराने जीएसटी वसूल करत आहे का हे चेक करणे
 
१- तुम्ही एखाद्या रेस्ट्रोत जेवायला गेले तर बिल नीट चेक करा. जीएसटी रजिस्ट्रेशन केलेले हॉटेलच त्याची वसूली करु शकते. तुम्हाला संशय असेल तर काही सेकंदात तुम्ही हे चेक करु शकता. त्यासाठी तुम्हाला आधी बिलाचे पैसे अदा करावे लागतील. या बिलावर असलेले जीएसटी टीन (GSTIN) दिलेला असतो. या नंबरने तुम्ही ओळखू शकता की ज्या दुकानातून किंवा हॉटेलातून तुम्हाला बिल मिळाले आहे ते रजिस्टर आहे, की नाही....
 
या युआरएलवर तुम्ही हे चेक करु शकता
https://services.gst.gov.in/services/searchtp
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या... आणखी काही महत्त्वपूर्ण बाबी....
बातम्या आणखी आहेत...